Cholesterol Control Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cholesterol Control : चिकन खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढतं का? चिकनच्या या रेसिपी ठरू शकतात घातक

चिकन ही बहुतेक लोकांची पसंती असते

दैनिक गोमन्तक

भारतात शाकाहारी लोकांपेक्षा मांसाहार खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2015-16 नुसार, भारतातील 78 टक्के महिला आणि 70 टक्के पुरुष मांसाहार करतात. अशा परिस्थितीत चिकन ही बहुतेक लोकांची पसंती असते कारण त्यात रेड मीटपेक्षा कमी फॅट असते आणि त्याची किंमतही जास्त नसते, पण चिकन खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे, चला जाणून घेऊया.

नॉनव्हेज खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते

रेड मीटमध्ये असलेल्या सॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, त्यामुळे अनेक आहारतज्ञ मांसाहारी पदार्थांपेक्षा चिकनला अधिक आरोग्यदायी मानतात. चिकन खाल्ल्याने शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण होते यात शंका नाही, पण जास्त प्रमाणात काहीही खाणे हानिकारक ठरते

चिकन खाणे फायदेशीर की हानिकारक?

चिकन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक, हे तुम्ही चिकन कसे शिजवले यावर अवलंबून असेल. जर तुम्ही चिकन शिजवताना जास्त तेल वापरले असेल, ज्यामध्ये जास्त सॅच्युरेटेड फॅट असेल तर ते कोलेस्ट्रॉल वाढवते.

या चिकन पाककृतींनी कोलेस्ट्रॉल वाढते

चिकन बनवताना लोणी, तेल किंवा इतर कोणतीही सॅच्युरेटेड फॅट जास्त वापरली तर साहजिकच कोलेस्ट्रॉल वाढेल. बटर चिकन, चिकन चंगेजी, कडई चिकन आणि अफगाणी चिकनमुळे फॅट वाढेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT