Chocolate Face Pack Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chocolate Face Pack: चेहऱ्यावर चॉकलेट फेसमास्क लावताना कोणती काळजी घ्यावी

Chocolate Face Pack: चेहरा चमकदार दिसण्यासाठी अनेक लोक चॉकलेट फेसमास्क वापरतात. जप तुम्हीही हा फेस मास्क वापरत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा. अन्यथा त्वचा खराब होऊ शकते.

Puja Bonkile

chocolate face pack while using these face pack take care of some things

सर्वांना चॉकलेट खायला खुप आवडते. अनेक लोक नाराज असल्यावर चॉकलेट खातात. कारण चॉकलेट खाल्यावर मुड चांगला होतो. तसेच तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चॉकलेट मास्क लावलात तर ते तुमची त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

त्वचेला लवचिक बनवून कोलेजन देखील वाढवते. त्यामुळे त्वचा अधिक तरूण दिसते. एवढेच नाही तर चॉकलेट मास्कमुळे तुमची त्वचा अधिक उजळ दिसते. त्याचा सुगंध तुम्हाला अधिक आरामशीर वाटतो. चॉकलेट फेस मास्कचे अनेक फायदे आहेत, जरी ते योग्यरित्या वापरणे महत्वाचे आहे.

योग्य चॉकलेट मास्क वापरावे

चॉकोलेट फेस मास्क लावताना नेहमी चांगले कोको पावडर वापरा किंवा 70 टक्क्यांपेक्षा जास्त कोको सामग्री असलेले डार्क चॉकलेट वापरावे. डार्क चॉकलेटमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट त्वचेसाठी फायदेशीर असतात. एवढेच नाही तर जेव्हाही तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चॉकलेट मास्क लावाल तेव्हा शरीराच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करावी. तुम्हाला जर काही त्रास झाला नाही तरच वापरावे.

वेळेचे भान ठेवावे

जेव्हा चेहऱ्यावर चॉकलेट मास्क लावता तेव्हा तुम्ही वेळेचेही भान ठेवले पाहिजे. अनेक वेळा लोक तासभर तोंडावर मास्क लावून ठेवतात. पण असे करू नका. आपल्या त्वचेवर सुमारे 15-20 मिनिटे राहू द्यावे. यानंतर, कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. नंतर त्वचेला टोनर आणि मॉइश्चरायझर लावावे.

त्वचा स्वच्छ करावी

चेहऱ्यावर चॉकलेट मास्क लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करावी. मास्क लावण्यापूर्वी सौम्य क्लीन्सरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करावा. यामुळे चेहऱ्यावरील मेकअप, घाण किंवा जास्तीचे तेल सहजपणे निघून जाते. मास्क त्वचेत अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश करतो. एवढेच नाही तर चॉकलेट मास्क लावण्यापूर्वी काही मिनिटे चेहऱ्यावर वाफ घ्यावी.

ब्रश स्वच्छ ठेवावे

जेव्हा तुम्ही चॉकलेट मास्क लावाल तेव्हा तुमचा ब्रशही स्वच्छ असावा. जर तुम्ही तुमच्या बोटाच्या साहाय्याने मास्क लावत असाल तर आधी तुमचे हातही स्वच्छ करावे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता कमी होते. एवढेच नाही तर चॉकलेट मास्क चेहऱ्यावर समान रीतीने लावावे. लक्षात घ्या की मास्कचा थर जास्त जाड नसावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT