Child Summer Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Child Summer Care: सावधान! उन्हाचा कडाका वाढतोय; तुमच्या चिमुरड्यांना उष्माघातापासून 'असे' वाचवा

Summer Health Tips: उन्हाची दाहकता आता चांगलीच जाणवायला लागली आहे. उन्हाच्या हा तडाखा लहान मुलांना हैराण करणारा आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Summer Health Tips Children : उन्हाची दाहकता आता चांगलीच जाणवायला लागली आहे. उन्हाच्या हा तडाखा लहान मुलांना हैराण करणारा आहे. मुलांत उष्णतेच्या विकाराचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे त्यांना गंभीर प्रकारच्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. उष्ण, ह्युमीड तापमानात मुले मर्यादेपेक्षा जास्त खेळत असतील वा आउटडोर फिजिकल ॲक्टिविटी करत असतील, तर त्यांना उष्णतेच्या विकाराचा धोका अधिक असतो. बाहेरचे तापमान अतिउष्ण असते, तेव्हा मुलांनी बाहेर जाणे अथवा खेळणे टाळावे. मुलाच्या शरीराचे तापमान खूप वाढले आणि तो गोंधळलेल्या अवस्थेत असेल तर अशावेळी त्याला तातडीने दवाखान्यात न्या.

उष्णतेने विकार

उष्णतेच्या सौम्य विकारांत ‘हीट क्रॅंप’ आणि ‘हीट एक्झाॅशन’ यांचा समावेश असतो. बहुतेकदा लहान मुलांना आणि टीनएजर्सना उन्हात खेळल्यावर वा काही फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यास असे विकार होतात. उष्माघातासारख्या गंभीर समस्या होऊ नयेत म्हणून उपाययोजना कराव्या लागतात.

मुलांत उष्माघात होण्याचे प्रमाण कमी असते. भर उन्हाळ्यात अचानक ओढलेल्या मृत्यूचे ते एक कारण आहे. उष्माघात ही एक स्थिती असून, अतिउष्ण आणि ह्युमिड वातावरणावर शरीराच्या तापमाननियंत्रण केंद्रात बिघाड होतो. शरीराचे तापमान मर्यादेपलीकडे वाढते आणि ‘बेशुद्धावस्था’ येऊन अचानक मृत्यू येतो.

‘हीट क्रॅम्प्स’मध्ये हातापायांच्या स्नायूंमध्ये पेटके येतात व ते वेदनादायी आणि जास्त काळ टिकणारे असतात. श्वासांची गती वाढते आणि स्नायूना सूज येते, ते जखडून जातात. उच्च तापमानामुळे घाम येण्याची प्रक्रिया वाढते. पाण्याबरोबर क्षारही बाहेर पडतात. अशावेळी मुलाला पाणी अथवा ओआरएसचे पाणी (इलेक्ट्रोलाईट) पाजा. क्रॅंप आल्यास तो स्नायू हलकेच स्ट्रेच करा.

‘हीट एक्झाॅशन’मध्ये डोके दुखते, मळमळ व उलट्या होतात. उभे असताना भोवळ येते. अशक्तपणा जाणवतो. कमालीचा थकवा येतो. त्वचा पांढरट, चिकट होते. चक्कर येते. चक्कर आल्यास त्याला तातडीने रुग्णालयात न्या. उष्णतेने घाम येऊन शरीरातील क्षार कमी होतात. त्यामुळे शरीरात पाण्याबरोबरच मीठही शरीरात जाईल, याची काळजी घ्यावी लागते.

उष्माघातामध्ये मुलाला थकवा येतो, ताप येतो, त्वचा कोरडी पडते, भूक लागेनाशी होते, चक्कर येते, डोके व डोळे दुखतात, पोट दुखते, बैचेनी वाढते, गोंधळलेली मानसिक अवस्था, शुद्ध हरपणे, ही उष्माघाताची काही लक्षणे आहेत. मुलाला थंड ठिकाणी हलवा. फॅन लावा. अंगावरचे अतिरिक्त कपडे काढून टाका. काखेत, जांघेत आईस पॅक्स ठेवा. लिक्विड्स द्या. लक्षात ठेवा उष्माघात ही एक इमर्जन्सी असते. उष्ण वातावरणात केलेल्या शारीरिक हालचाली, व्यायामामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या उष्णतेशी शरीराला मिळतेजुळते घेण्यात अपयश येते, त्याचबरोबर तापमाननियंत्रणही करता येत नाही आणि शरीर तापते. सौम्य प्रकारचे विकार लवकर बरे होतात; पण उष्माघातासारख्या गुंतागुती जीवावर बेतणाऱ्या असतात.

कडक उन्हात आऊटडोर ॲक्टिविटी, फुटबॉल, क्रिकेट असे खेळ खेळल्याने अथवा जिममध्ये किंवा इनडोअर ॲक्टिविटीमुळे उष्णतेच्या विकाराचा धोका असतो. पाणी पिण्याचे प्रमाण कमी असेल, मूल आजारी असेल, त्याला काही औषधं चालू असतील, मूल लठ्ठ असेल, तर त्या मुलांत अशा विकारांचे प्रमाण जास्त असते.

प्रतिबंध

उष्णतेचे विकार व उष्माघातापासून सहज बचाव करता येतो. सर्वप्रथम उन्हात खेळणे टाळा. गेम किंवा आउटडोर ॲक्टिविटी केल्याच, तर त्या सकाळी लवकर अथवा सांयकाळी कराव्यात. दरम्यान लहान लहान ब्रेक घ्या, पाणी प्यायला द्या. अतिउष्णता असेल, ह्युमिडीटी वाढलेली असेल तर अशा ॲक्टिविटी करू नयेत. अशा ॲक्टिविटींपूर्वी आणि नंतर प्रत्येक २० मिनिटांनी त्याला पाणी पाजा.

उन्हाळ्यात अशी घ्या काळजी

मुलांचे कपडे सुती, सैल आणि शक्यतो पांढऱ्या रंगाचे असावेत. बाहेर जाताना त्याच्या डोक्याला टोपी-रुमाल बांधा. सोबत वाॅटरबॅग घ्या. घराबाहेर पडण्यापूर्वी त्याला पाणी पाजा.

दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडणे टाळा. बाहेर पडताना डोक्याबरोबर कान आणि डोळे झाका. उन्हाळ्यात केस शक्य तितके कमी ठेवा.

उन्हाळ्यात घामोळे, खाज येणे, अशा त्वचारोगांचा त्रास मुलांना होतो. कोमट किंवा थंड पाण्याने अंघोळ हा सर्वोत्तम उपाय!

दुपारच्या भरउन्हात मुलांना घरात ठेवणे, हे आव्हानच असते; पण कॅरम, बुद्धिबळ यांसारख्या घरात खेळता येण्याजोग्या खेळात मुलांचे मन रमवता येईल.

उन्हाळ्यात भूक मंदावते. पाण्याची गरज वाढते. ताज्या फळांचा रस, शहाळ्याचे पाणी, कैरीचे पन्हे अशी पेये मुलांना द्या.

डिहायड्रेशन झाल्यास ओआरएस पाजा.

काकडी, टोमॅटो, कांदा अशा पदार्थाचा आहारात समावेश करा. तेलकट, तूपकट पदार्थ देणे टाळा.

मुलांना रस्त्यावरील बर्फगोळे, कुल्फी खायला देऊ नका. उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणेही टाळा. शिळे, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खाणे टाळा.

डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mobor Crime News: मोबोर समुद्रकिनाऱ्यावर थरार: पूर्ववैमनस्यातून छत्तीसगडमधील तरूणाची हत्त्या

Goa weather: मान्‍सूनपूर्व पावसात 40 टक्‍क्‍यांनी वाढ; सलग दोन दिवस हजेरी, जनजीवन विस्‍कळीत

Bangladesh Road Accident: ईदच्या आनंदावर काळाचा घाला! बांगलादेशात प्रवाशांनी भरलेला ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू; पहाटे घडला थरारक अपघात

Goa Milk Price Hike: गोवा डेअरीचे दूध 2 रुपयांनी महागले! सोमवारपासून नवीन दर लागू , जनतेला महागाईचा फटका

Budh Gochar 2026: नोकरीत बढती अन् व्यवसायात बक्कळ पैसा! बुध गोचर बदलणार तीन राशींचं भाग्य; घरात येणार अलोट संपत्ती

SCROLL FOR NEXT