Diet Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Child Care Tips: 'या' डाळीमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना! अनेक आजार दूर राहतील

Puja Bonkile

Diet Care Tips: लहान मलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि त्यांची योग्य वाढ होण्यासाठी आहारात पोषक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. लहान मुलांना मसूर डाळीचे पाणी प्यायला देणे आरोग्यदायी असते. मसूर डाळमध्ये फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी, लोह, जस्त आणि कॅल्शियम यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. जाणून घेऊया मुलांना मसूर डाळ खायला दिल्यास कोणते फायदे होतात.

  • पचनसंस्था

लहान मुलांना मसूर खायला दिल्याने त्यांची पचनसंस्था चांगली राहते. या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पोट निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. मसूर डाळ पचायला हलकी असते यामुळे लहान मुलांना खायला द्यावी.

  • वजन वाढते

मुलांच्या कमी वजनामुळे अनेक आई चिंतेत असतात. अशावेळी मुलांना मसूर खायला देताना देशी तूप घातल्याने त्यांचे वजन वाढण्यास मदत होते. डाळी या पौष्टिक अन्न आहे. मुलांना खायला दिल्याने ते निरोगी राहते आणि अनेक आजारांपासून त्यांचा बचाव होतो.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते

मसुळ डाळ लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे शरीरात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म वाढवतात आणि रोगांपासून दूर ठेवतात. यामुळे होणारे व्हायरल इन्फेक्शन सहज कमी होते.

  • हाडांचे निरोगी आरोग्य

मसूरमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे हाडं मजबूत राहण्यासाठी मदत मिळते. जर तुमच्या मुलांची हाडे कमकुवत असतील तर तुम्ही मुलांना रोज मसूर डाळ खायला देऊ शकतात.

  • अशक्तपणा येत नाही

मसूर डाळ खाल्याने लहान मुलांमध्ये येणारा अशक्तपणा कमी होतो. मसूर डाळचे सेवन केल्याने शरारीला ऊर्जा मिळते. मसूरमध्ये असलेल प्रतिने आणि लोह शरीराला अशक्तपणापासून दूर ठेवते.

टिप: लहान मुलांसाठी मसूर खाणे फायदेशीर असते. पण मुलांना कोणताही आजार किंवा अॅलर्जीचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच डाळ खायला द्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT