Chapatis of this method for weight loss Will help  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Wet Loss करण्यासाठी 'या' 4 पद्धतीच्या चपाती करतील मदत

आता वजन कमी करण्यासाठी घाम गाळायची गरज नाही.

दैनिक गोमन्तक

वजन कमी करण्यासाठी अनेकजन जीम लावणे, खाणे कमी करणे यासारख्या अनेक पद्धतीचा वापर करतात. पण खर तर आपण आपल्या आहारात बदल करावा. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. यासाठी आपल्या रोजच्या आहारातील चपातीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. अनेक लोक गव्हाच्या चपातीचे सेवन करतात. पण याला पर्याय म्हणून आपण अनेक प्रकारच्या चपातीचे सेवन करू शकतो.

* चोकर चपाती

तुम्हाला जर चपातीमधून अधिक पोषण मिळवायचे असेल तर पिठामधील कोंडा वेगळा काढणे टाळावे. कारण पिठाच्या कोंड्यामध्ये अधिक पोषक घटक असतात. गव्हाच्या चपातीमध्ये कार्ब्स, लोह, नियासिन, व्हिटॅमिन बी 6, थायामिन आणि कॅल्शियम असते तर कोंड्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.

* मल्टीग्रेन चपाती

रोटी जर अधिक चवदार बनवायची असेल तर आणि त्यात एक मोठा चमचा बेसन घालावे. बेसनमध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. यामुळे शरीराची कॅलरीज बर्न करण्याची प्रकिया चांगली राहते. अशा पद्धतीने गव्हाच्या पिठात बेसन घालून मल्टीग्रेन पीठ बनवता येते.

* सत्तूची चपाती

सत्तूचे पीठ आरोग्यासाठी लाभदायी असते. तुम्ही सत्तूच्या पिठापासून चपातीबनवू शकता. आपण उन्हाळ्याच्या दिवसांत सत्तूचे पीठ दुधात टाकून खातो. या रोटीचे नियमित सेवन केल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहून शरीर सक्रिय ठेवण्यास मदत करते. तसेच वजन कमी करण्यासाठी मदत करते.

* सोया चपाती

सोयाबिन आपल्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. या रोटीमध्ये ओमेगा-3 अॅसिड मुबलक प्रमाणात असते. तसेच या चपातीमध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात. सोया चपाती वृद्धासाठी फायदेशीर मानली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT