Benefits Of Carom Seeds Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits Of Carom Seeds: केसांपासून ते त्वचेपर्यंत ओव्याचे आहेत जबरदस्त फायदे

आयुर्वेदातसुद्धा ओव्याला (Carom seed) महत्व आहे.

दैनिक गोमन्तक

ओव्याचा (Carom Seeds) सर्वाधिक वापर स्वयंपाकघरात (Kitchen) केला जातो. ओव्याचा वापर लोणचे (Pickles), थालीपीठ, भजी यासारख्या अनेक पदार्थामध्ये (Food) केला जातो. तसेच ओवा (Carom Seeds) पोटासंबंधित (Stomach) अनेक विकारांवर गुणकारी आहे. आयुर्वेदातसुद्धा (Ayurveda) ओव्याला खूप महत्व प्राप्त झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया ओव्याचे महत्वाचे फायदे.

* पचनक्रिया सुरळीत होते

ओव्याचे (Carom Seeds) नियमित सेवन केल्याने पचनक्रिया (Digestion) सुरळीत होण्यास मदत मिळते. ओवा अपचन, आंबटपणा, गॅस यावर उपयुक्त आहे. यासाठी अर्धा चमचा ओवा 1 ग्लास पाण्यात मिक्स करून घेवू शकता. यामुळे पोटाचे आजार कमी होणातस मदत मिळते.

* त्वचेसाठी उपयुक्त

ओव्यामध्ये (Carom Seeds) थायमॉल हा घटक असतो. यामुळे शरीरावरील जळजळ कमी होण्यासाठी सुद्धा ओव्याचा वापर केला जातो. यासाठी ओवा पाण्यात मिक्स करून पेस्ट तयार करावी. जळजळ होणाऱ्या किंवा जखम झालेल्या भागावर ही पेस्ट लावावी. नंतर 5 ते 10 मिनिटांनी स्वच्छ करावे.

* केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

केसांचे गळणे कमी करण्यासाठी, पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी ओव्याचे (Carom Seeds) सेवन करणे फायदेशीर ठरते. यासाठी 2 चमचे ओवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. नंतर पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे. असे केल्याने केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत मिळते.

* भाजी आणि कोशिंबीरची चव वाढवते

ओव्यामध्ये (Carom Seeds) मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. अनेक पदार्थांमध्ये ओव्याचा वापर केला जातो. कडी, भजी, चटणी, यासारख्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. तसेच ओव्याचा वापर मुखवास म्हणून देखील वापर केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT