Skin Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care: उन्हाळ्यातच नाही तर पावसातही त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे 'सनस्क्रीन'

तज्ञांच्या मते, सनस्क्रीन प्रत्येक ऋतूमध्ये आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे हे केवळ उन्हाळ्याच्या दिवसांत आवश्यक नसते. तज्ञांच्या मते, सनस्क्रीन प्रत्येक ऋतूमध्ये आवश्यक आहे. कारण सनस्क्रिन तुमच्या त्वचेला पावसाळ्यातही अनेक समस्यांपासून वाचवू शकतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की सनस्क्रीन संरक्षण फक्त उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच फक्त तुमची मदत करतो, तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण पावसाचे आलेले ढग हे सूर्याच्या अतिनील किरणांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून थांबवू शकत नाहीत.

UVA आणि UVB हि किरणे तुमच्या त्वचेसाठी घातक आहेत

तूम्हाला जरी ढगाळ वातावरणामुळे गारवा जाणवत असला तरीसुद्धा तुम्ही सूर्याच्या किरणांपासून बचाव करू शकत नाही. सूर्याचे हनिकारक UVA आणि UVB किरण पावसाच्या दरम्यान देखील तुमची त्वचा खराब करू शकतात. ही किरणे पाण्यात शिरून त्वचेपर्यंत पोहोचू शकतात. UVA आणि UVB हि किरणे तुमच्या त्वचेसाठी घातक आहेत, कारण यामुळे तुम्हाला त्वचेचा कर्क रोग होण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना महामारीमुळे, जर तुम्ही घराबाहेर कमी पडत असाल तर ही वेगळी बाब आहे. परंतु जर तुम्हाला सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान घराबाहेर पडायचे असेल तर सनस्क्रीनचा वापर तुम्ही जरूर करावा. उन्हात बाहेर पडताना जरी तुम्ही त्वचा झाकत असाल तरी सुद्धा त्वचेवर सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. जर तुम्हाला जास्त वेळ बाहेर रहायचे असेल तर दिवसातून कमीत-कमी दोन ते अडीच तासांच्या अंतराने दिवसातून दोन-तीन वेळा सनस्क्रीन लावा. घरातून बाहेर पडण्याच्या 30 मिनिटांपूर्वी सनस्क्रीन लावा.

जाणून घ्या सनस्क्रीनमधील एसपीएफ(SPF) किती असावे.

कोणत्याही प्रकारचे सनस्क्रीन लोशन किंवा क्रीम निवडलाट तरीही ते तुम्हाला संरक्षण देऊ शकते. आजकाल, तेल आधारित आणि पाण्यावर आधारित सनस्क्रीन बाजारात उपलब्ध आहेत, तसेच वॉटरप्रूफ सनस्क्रीन देखील बाजारात उपलब्ध आहेत. याचा देखील वापर तुम्ही करू शकता. वॉटरप्रूफ किंवा स्वेटप्रूफ सनस्क्रीन विशेषतः पार्ट्या किंवा गेट-टुगेदरसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत. सनस्क्रीनमध्ये चांगले एसपीएफ म्हणजेच किमान 20-30 एसपीएफ़ असावे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त संरक्षण मिळेल. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार एक चांगला सनस्क्रीन ब्रँड निवडण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी किंवा त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सनस्क्रीन निवडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT