Car Gadgets Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Gadgets: प्रावासात सेफ ड्रॅव्हिंगसाठी 'ही' चार गॅजेट्स येतील कामी

Car Gadgets: कारने प्रवास करताना ती सुरक्षितपणे चालवणे गरजेचे असते. अन्यथा अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे कार सुरक्षित ठेवण्यासाठी कोणची कॅजेट वापरावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

car care tips these car gadgets usefull for safe driving read full story

भारतात रस्ते अपघातात मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडतात आणि हजारो जखमी होतात. यामुळे प्रवासादरम्यान गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी काही गॅजेट मदत करू शकतात. हे गॅजेट कोणते आहेत हे जाणून घेऊया.

पंचर किट

प्रवासादरम्यान गाडीचा टायर पंक्चर झाल्यास ते दुरूस्त करण्यासाठी पंक्चर किट सोबत ठेवणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या प्रवासाचा आनंद खराब होणार नाही तसेच तुम्ही योग्य त्या ठिकाणी वेळेत पोहोचाल. अशा प्रकारचे किट बाजारातून सहज मिळतात. प्रवासादरम्यान गाडी पंक्चर झाली तर तुम्ही स्वतः पंक्चर दुरुस्त करून सुरक्षित प्रवास करू शकता.

TPMS

अनेक कारमध्ये कंपन्या TPMS म्हणजेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमची सोय देतात. पण जुन्या गाड्यांमध्ये हे फीचर बाहेरूनही बसवता येते. या सुविधेमुळे रस्त्यावर गाडी चालवताना सर्व टायरमधील हवेच्या दाबाची अचूक माहिती मिळते. याचा फायदा असा की टायरमधील हवा सामान्यपेक्षा खूप कमी किंवा जास्त असल्यास अपघाताच्या वाढत्या धोक्याची माहिती मिळते. ज्यामुळे टायरमध्ये हवेचा दाब योग्य ठेवता येतो आणि अपघात होण्याची शक्यता कमी असते.

नाईट व्हिजन ग्लास

कारसाठी अनेक प्रकारचे ग्लास बाजारात उपलब्ध असतात. तुम्ही रात्री गाडीने प्रवास करत असाल तर तुम्ही तुमच्या कारमध्ये नाईट व्हिजन ग्लासेस लावू शकता. असे केल्याने, तुम्हाला रात्री प्रवास करणे सोपे होईल आणि तुमची दृश्यमानता देखील सुधारेल.

डॅश कॅम

कारमधील सुरक्षा वाढवण्यासाठी तसेच प्रवास करताना सुरक्षा सुधारण्यासाठी डॅश कॅमचा वापर केला जाऊ शकतो. अनेक पर्यायांसह डॅश कॅम्स बाजारात उपलब्ध आहेत. जे कारमध्ये सहज बसवता येते. हे समोर तसेच मागे वापरले जाऊ शकते. ॲपद्वारे त्यांचा वापर करणे सोपे होते. अपघात झाल्यास ते कार स्वार सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT