Car Headrest Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Headrest: कारच्या सीटवर लावलेल्या 'हेडरेस्ट'चे आहेत अनेक फायदे; जाणून घ्या

कार कंपन्यांद्वारे सीटवर हेडरेस्ट बसवलेले असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की वाईट काळातही जीव वाचवण्यास मदत करते.

Puja Bonkile

Car Headrest: कार कंपन्यांद्वारे कारच्या सीटवर वेगळे होणार हेडरेस्ट्स लावले जातात. वाईट काळातही लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे फार कमी लोकांना माहीत असेल. हेडरेस्ट्सचा कसा वापर होतो हे जाणून घेऊया.

हेडरेस्ट कसे काम करते?

सामान्य परिस्थितीत कारमध्ये असलेले हेडरेस्टचे कार्य कारमध्ये बसलेल्या प्रवाशाच्या डोक्याला आराम देणे आहे. यासाठी त्यात अनेक पोझिशन देखील देण्यात आली आहेत जेणेकरून वेगवेगळ्या उंचीच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार ती सेट करता येईल.

कधी येते कामात?

कारचा अपघात झाला तर आपल्या डोक्याचे रक्षण करण्यासाठी हेडरेस्ट वापरतात. त्याच्या डिझाईनमुळे ते अपघातादरम्यान तुमचे डोके खूप मागे जाण्यापासून प्रतिबंधित करते. हेडरेस्ट्स अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ते पुढे झुकतात.

अपघाताच्या वेळी मानेला संरक्षण मिळते आणि गंभीर दुखापत होण्याचा धोका कमी होतो. NCAP सेफ्टीच्या ऑस्ट्रेलियन न्यू कार असेसमेंट प्रोग्रामनुसार, अपघात झाल्यास मानेचे संरक्षण करणे हा त्याचा एकमेव उद्देश आहे.

अपघाताच्या वेळी, जेव्हा एअरबॅग उघडतात आणि त्यांच्याशी टक्कर झाल्यावर तुम्ही मागे पडता तेव्हा हेडरेस्ट तुमची मान खूप मागे जाण्यापासून रोखते.

अशा अशा प्रकारे करू शकता वापर

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की काही कारणाने तुम्ही तुमच्या कारमध्ये अडकले आणि कारचे सर्व दरवाजे लॉक झाले तेव्हा आपल्याला काहीतरी हवे असते ज्याच्या मदतीने आपण कारमधून बाहेर पडू शकतो.

अशावेळी हेडरेस्टचा वापर केला जाऊ शकतो. कार सीटच्या आत हेडरेस्टचा एक भाग आहे जो टोकदार असतो. या धारदार भागाने गाडीच्या काचेवर आदळल्यास काच फोडणे सोपे होते आणि तुम्ही गाडीतून बाहेर पडू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

Horoscope: 4 ऑक्टोबरचा दिवस ठरणार खास! 'या' राशींचं नशीब उजळणार; नोकरी-व्यवसायात मोठा फायदा, प्रेमजीवनही होईल सुखकर

God In Difficult Times: सुखात देवाचा विसर, दुःखात आर्त हाक; संकटांच्या काळातच का अधिक घट्ट होतं भगवंताशी नातं?

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

SCROLL FOR NEXT