Green Chilli  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Green Chilli: हिरव्या मिरचीचे शरीरावर होतात 'हे' परिणाम

Green Chilli: मात्र हिरव्या मिरच्यांचे अतिसेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. तुमच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

Green Chilli: आपल्यापैकी अनेकांना हिरव्या मिरच्या घातलेल्या भाज्या खायला आवडते. काहींना दररोड हिरव्या मिरच्यांची चटणी खायला आवडतो. मात्र हिरव्या मिरच्यांचे अतिसेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. तुमच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

१. मानसिक स्वास्थ

गरजेपेक्षा जास्त तिखट खाल्ल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मनावर ताण वाढण्यास आहारात सातत्याने मिरच्यांचा समावेश असेल तर कारणीभूत ठरतात.

२. आतड्यांमध्ये वेदना

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे एक संयुग असते ज्यामुळे आतड्यांमध्ये वेदना होऊ शकते.

३. फॉलिक अॅसिड

हिरवी मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात फॉलिक अॅसिडची पातळी वाढते.

४. उच्च रक्तदाब

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिनच्या उपस्थितीमुळे रक्तदाब वाढू शकतो.

५. झोप न लागणे

हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने झोपेची समस्या उद्भवू शकते, कारण यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊ शकते.

६. अॅसिडिटी

हिरवी मिरची खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते कमी प्रमाणात खा.

७. जठराची सूज

कॅप्सेसिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने जठराची सूज होऊ शकते.

८. अतिसार

हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने अतिसार होऊ शकतो कारण त्याचा आतड्यांवर वाईट परिणाम होतो.

९. टीबी

ज्या लोकांना आधीच टीबीचा आजार आहे त्यांनी हिरवी मिरची खाऊ नये कारण त्यामुळे त्रास वाढेल.

१०. तोंडात जळजळ होणे

कॅप्सेसिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तोंडात जळजळ होऊ शकते.

मिरचीमध्ये कोणते पोषक घटक आढळतात

कॅप्सेसिन, अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक्स, अत्यावश्यक तेले, टॅनिन, स्टिरॉइड्स यांचा समावेश असलेल्या अनेक पोषक तत्वांचा हा समृद्ध स्रोत आहे. जर तुम्ही याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले तर त्याचे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT