Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cancer: हळदीचे सेवन करते कर्करोगाचा धोका कमी? वाचा काय सांगतेय संशोधन आणि तज्ञ

Turmeric For Cancer Prevention: कर्करोगाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरुन अनेक आयुर्वेद तज्ञ या आजारापासून बचाव करण्यासाठी खाल्लेल्या काही गोष्टींचा उल्लेख करत आहेत.

Manish Jadhav

जगभरासह भारतातही कर्करोगाचा धोका वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2023 मध्ये देशात या आजाराचे 14 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. कर्करोगाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरुन अनेक आयुर्वेद तज्ञ या आजारापासून बचाव करण्यासाठी खाल्लेल्या काही गोष्टींचा उल्लेख करत आहेत. या यादीत हळद आणि गव्हाच्या गवताच्या रसाचाही समावेश आहे, परंतु या गोष्टी खरोखरच कर्करोगापासून संरक्षण करु शकतात की त्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान पोहोचवतात? चला तर मग याबाबत तज्ञांच्या आणि काही संशोधनांच्या संदर्भातून जाणून घेऊया...

हळदीबद्दल बोलायचे झाल्यास, आयुर्वेद डॉक्टर आणि काही आरोग्य तज्ञ हळद हा आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. हळदीमध्ये (Turmeric) अँटी-एलर्जिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे आरोग्य सुधारु शकते. असा दावा देखील केला जातो की, हळदी कर्करोग रोखते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन शरीरातील पेशींना वेगाने वाढण्यापासून रोखते आणि जळजळ कमी करुन कर्करोगाचा धोका कमी करु शकते, परंतु या बाबतीत काही संशोधन झाले आहे का? कर्करोग तज्ञ याबाबत काय सांगतात? त्यांच्याकडूनच याबद्दल जाणून घेऊया.

हळदीचे सेवन कर्करोगाचा धोका कमी करते?

मॅक्स हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. रोहित कपूर सांगतात, हळदीमध्ये अनेक गुणधर्म आहेत. NCBI आणि PubMed वरील अनेक संशोधनातून असे दिसून आले की, कर्क्यूमिन कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करु शकते, परंतु आतापर्यंत सर्व पुरावे प्री-क्लिनिकल चाचण्या आणि प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांमधून आहेत. काही चाचण्या मानवांवर देखील केल्या गेल्या आहेत, परंतु केवळ हळदीचे सेवन कर्करोगाचा धोका कमी करते या दाव्याची पुष्टी संशोधनात झालेली नाही.

हळदीमुळे यकृताला हानी पोहोचण्याचा धोका

अमेरिकेतील एका अभ्यासातून असे दिसून आले की, अमेरिकेत हळदीमुळे यकृताला हानी पोहोचण्याचे प्रमाण वाढत आहे, हे त्याच्या अतिसेवनामुळे होत आहे. जास्त काळ किंवा जास्त प्रमाणात हळदीचे सेवन काही लोकांमध्ये यकृताला हानी पोहोचू शकते. जरी या घटना अत्यंत दुर्मिळ असल्या तरी अमेरिकेत त्याचे प्रमाण वाढत आहे. अभ्यासात पुढे सांगण्यात आले की, सामान्यपणे हळदीचे सेवन सुरक्षित मानले जाते, परंतु जर ती जास्त प्रमाणात सेवन हानी पोहचवू शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हळदीचे सेवन करा

डॉ. रोहित यांच्या मते, जर हळदीचे जास्त सेवन केले तर ते फायद्याऐवजी नुकसान करु शकते. त्याचा यकृतावर परिणाम होतो. जास्त प्रमाणात हळदीचे सेवन केल्यास गॅस, आम्लता किंवा अतिसारचा त्रास होऊ शकतो. दरम्यान, हळदीचे अनेक फायदे आहेत, परंतु जे लोक नियमितपणे त्याचे सेवन करतात त्यांना कर्करोग होणार नाही हे खरे नाही. हळद कर्करोगावर (Cancer) उपचार आहे हे देखील खरे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT