कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. आज ही कर्करोग म्हणजे मृत्यूला जवळ करणे असं समीकरण असून यापूढे हे समिकरण बदण्याची शक्याता निर्माण झाली आहे. यामूळे समाजातील कर्करोगाची धास्ती ही कमी होण्यास मदत होणार आहे. ( The world will be free from cancer )
मॅनहॅटन, यूएस मधील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर येथे प्रथमच, औषध चाचणीने रुग्णांमध्ये कर्करोगाचे 100 % निर्मूलन दर्शविले आहे.त्यामूळे जगभरात रुग्णांमध्ये धास्ती निर्माण करणाऱ्या कर्करोगावर उपाय निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्याच्यामूळे जगभरात होणारी मोठी जीवित हाणी टळणार आहे. कर्करोगाच्या मगरमिठीतून अनेक रुग्णांची सुटका होण्याची शक्यता आहे. संशोधकांना कर्करोगावर औषध सापडल्याचा दावा केला जात आहे. न्यूयॉर्क टाईम्स या दौनिकाच्या हवाल्याने जगभरातील प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे.
न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,18 रुग्णांच्या एका गटावर संशोधकांनी संशोधन केले. त्याला आश्चर्यकारक प्रतिसाद मिळताना दिसून आला. या गटातील रुग्णांनी डॉस्टारलिमॅब नावाचे औषध सुमारे सहा महिने घेतले. हा प्रयोग अगदी लहान क्लिनिकमध्ये करण्यात आला. या क्लिनिकमध्ये रुग्णांवर सहा महिन्यांपासून अधिक काळ उपचार आणि संशोधन सुरु होते. औषध घेतल्यावर या रुग्णांचा ट्यूमर गायब झाल्याचे आढळून आले.
दरम्यान, डॉस्टारलिमॅब नावाच्या औषधाचा कर्करोगावर परिणाम जाणवून आल्याच्या दावा केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हे औषध सर्व प्रकारच्या कर्करोगावर परिणामकारक ठरु शकते का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून त्या दृष्टीने संशोधानस सुरुवातही झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात चाचण्या, संशोधन आणि अभ्यास आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.