Goji Berries Benefits: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goji Berries Benefits: लडाखमध्ये मिळणारी 'गोजी बेरी' या आजारांवर ठरते रामबाण उपाय

चीनमध्ये या फाळाचा वापर औषध म्हणून वापर केला जातो.

दैनिक गोमन्तक

Goji Berries Benefits: गोजी बेरी हे लडाखमध्ये आढळणारे एक आशियाई फळ आहे. हे फळ आकाराने लहान असले तरी ते खूप फायदेशीर आहे. चवीला हे फळ गोड आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आहे. त्यात व्हिटॅमिन सी भरपुर असते. लडाखशिवाय हे फळ चीनमध्ये देखील आढळते आणि गोजी बेरीचा वापर चीनमध्ये 2000 वर्षांहून अधिक काळ औषध म्हणून केला जात आहे.

  • मधुमेह

गोजी बेरी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना त्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. 2015 च्या अभ्यासात असे आढळून आले की गोजी बेरी रक्तातील इंसुलिन आणि ग्लुकोजचे प्रमाण संतुलित करतात. गोजी बेरी टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये एचडीएल पातळी वाढवतात.

  • यकृताच्या आजारात फायदेशीर

चीनमध्ये (China) एखाद्याला यकृताचा आजार झाला असेल तर गोजी बेरीचा वापर केला जातो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, गोजी बेरी यकृताचे आरोग्य (Health) राखण्यासाठी फायदेशीर आहेत. यकृताच्या कर्करोगाच्या पेशींवरील संशोधनात असे दिसून आले आहे की गोजी बेरी ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करू शकतात.

  • कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त
    जर्नल ऑफ ड्रग डिझाईन डेव्हलपमेंट किंवा थेरपीमध्ये काशिद यांनी दिलेल्या अहवालानुसार, गोजी बेरी ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करतात आणि बरे होण्याच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देतात, म्हणूनच कर्करोगाच्या रुग्णांना आहारात गोजी बेरीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्यात असलेले व्हिटॅमिन सी, कॅरोटीनोइड्स, झेक्सॅन्थिनसह अँटिऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशींशी लढतात, जळजळ कमी करतात आणि शरीरातून हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.

diabetes
  • डोळ्यांसाठी फायदेशीर

एका संशोधनानुसार, गोजी बेरीमध्ये डोळ्यांच्या आजारांचा धोका आणि चमक कमी करण्यासाठी औषधी गुणधर्म आहेत. हे अतिनील किरण ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि आसपासच्या मुक्त रॅडिकल्सपासून डोळ्यांचे संरक्षण करते.

  • रोग प्रतिकारशक्ती निर्माण करा

गोजी बेरीमध्ये असलेले निरोगी अँटिऑक्सिडंट रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करतात, ते व्हिटॅमिन ए आणि सी समृद्ध असतात, जे रोगांशी लढण्यास मदत करतात.

  • गोजी बेरीचे तोटे

गोजी बेरीमध्ये बेटेन असते, हा घटक गर्भपातासाठी वापरला जातो, हे गर्भवती महिलांनी सेवन करू नये. गोजी बेरीचे जास्त सेवन केल्यास अतिसार, पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. शक्य आहे. अशा परिस्थितीत, ते सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT