Budhawar Upay Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Budhawar Upay: बुधवारी एक रूपयाचा 'असा' करा वापर, दूर होतील समस्या

Budhawar Upay: बुधवार हा दिवस गणपतीला समर्पित असतो. या दिवशी गणेशाची मनोभावे पुजा केल्यास अनेक समस्या दूर होतात.

Puja Bonkile

Budhawar Upay: हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेंना समर्पित असतो. त्याचप्रमाणे बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. तसेच हा दिवस बुध ग्रहाशी संबंधित आहे.

असे मानले जाते की बुधवारी विधीनुसार आणि मनोभावे गणपती बाप्पाची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

गणपतीला मंगलमूर्ती आणि विघ्नहर्ता म्हणतात. अशावेळी बुधवारी गणपतीचे नाव घेऊन नवीन कार्याची सुरुवात केल्याने अवघड कामात यश मिळते.

यासोबतच ज्योतिषशास्त्रात काही उपायही सांगण्यात आले आहेत, जे बुधवारी केल्यास फायदेशीर ठरतात. या उपायांचे पालन केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख-समृद्धी लाभते. चला जाणून घेऊया बुधवारी कोणते उपाय करावे.

एक रूपया

तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी बुधवारी एक रुपयाच्या नाण्याचा हा उपाय करा. हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो.

यासाठी बुधवारी एक रुपयाचे नाणे घेऊन त्यात मोहरीच्या तेलाचा एक थेंब टाका आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना करताना शनि मंदिरात ठेवावा. या उपायाने शनिदोषापासून आराम मिळतो.

कोळसा

शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोळशाच्या दगडावर शत्रूचे नाव लिहून बुधवारी वाहत्या पाण्यात टाकावे. हा उपाय सलग चार बुधवारी करावा.

तांदुळ

व्यवसायात यश हवे असेल तर मदारच्या रोपाला तांदूळ अर्पण करावे. तसेच बुधवारी सकाळी त्याची पूजा करावी. याशिवाय या दिवशी कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण केरावे. यामुळे नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होते.

गुळ

सुंदर आणि निरोगी शरीरासाठी गव्हाच्या चपातीमध्ये गूळ घालून बुधवारी नर म्हशीला खाऊ घाला. यामुळे अनेक आजार दूर राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यात आलो, वर्षभराचा अपराधीपणा आठवड्यात गायब" रणवीर अलाहाबादिया लहानग्यांसोबत ट्रीपवर

Matoli: पोर्तुगिजांनी मंदिरांची तोडफोड सुरु केली, काही लोक वेंगुर्ल्यात जाऊन स्थायिक झाले; अंत्रुजातील माटोळी वैभव

Goa Fishing: गोव्याची वाटचाल मत्स्य दुष्काळाकडे?

Moon Eclipse: खगोलप्रेमींसाठी अविस्मरणीय क्षण! गोव्याच्या आकाशात लाल चंद्र दिसणार का?

Goa Badminton: पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेची चुरस! गोव्याच्या रेहानीला रौप्य, भगतला ब्राँझपदक

SCROLL FOR NEXT