
ranveer allahbadia goa trip: लोकप्रिय यूट्यूबर आणि प्रभावशाली व्यक्तीमत्व असलेल्या रणवीर अलाहाबादियाने अलीकडेच गोव्याला दिलेल्या भेटीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ही सहल जरी केवळ तीन दिवसांची असली, तरी ती त्यांच्यासाठी खूप खास ठरली. या वर्षातील अनेक कसोटीच्या क्षणांनंतर ही सुट्टी त्यांच्यासाठी 'सावरण्याचा अंतिम टप्पा' ठरली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेषतः आपल्या भाची आणि नुकत्याच जन्मलेल्या पुतण्यासोबत घालवलेल्या वेळेमुळे त्याला मानसिक समाधान आणि नवी ऊर्जा मिळाल्याचे त्याने सांगितले.
आपल्या पोस्टमध्ये रणवीरने या वर्षात आलेल्या कठीण प्रसंगांचा उल्लेख केला. त्याच्या काही कृतींमुळे कुटुंबाला त्रास झाला असावा, याबद्दल त्याला आजही अपराधीपणाची भावना वाटते. तो म्हणाला की, "यावर्षी माझ्यामुळे त्यांना जे सोसावे लागले, त्याबद्दल मी नेहमीच विचार करतो.
अपराधीपणा घेऊन झोपतो आणि त्याच भावनेने उठतो." मात्र, गोव्याच्या या खास आठवड्यामुळे त्यांच्या मनातील हा अपराधीपणाचा भाव दूर झाला आहे. हा प्रवास त्यांच्या आईच्या ६०व्या वाढदिवसानिमित्तही खास होता. कुटुंबाला एकत्र आणण्यात त्यांना यश मिळाले आणि सर्वांनी एकत्र येऊन आयुष्यतील सर्वात सुंदर आणि मनापासून भरभरून जगलेली सुट्टी अनुभवली, असेही त्यांनी सांगितले.
या सहलीदरम्यान त्याला पहिल्यांदाच आपल्या नवजात पुतण्यासोबत वेळ घालवता आला. त्याची काळजी घेता आली आणि त्याला जवळून जाणून घेता आले. कुटुंबातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींना पूर्ण लक्ष देता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
आईच्या ६०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबाच्या तीन पिढ्या एकत्र आल्याचा आनंद त्यांनी पोस्टमध्ये नमूद केला. या वर्षातील अनुभवानंतर तो आपल्या कुटुंबाबद्दल अधिकच संवेदनशील आणि संरक्षक बनलाय. म्हणूनच, यापुढे कुटुंबातील सदस्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
गोव्याच्या या सुट्टीमुळे त्यांना पुन्हा एकदा 'पूर्वीचीच प्रेरणा' आणि 'तीच सर्जनशील ऊर्जा' परत मिळाल्याचा अनुभव आला आहे. अनेक वर्षांपासून गोवा हे त्याच्यासाठी शांतता आणि प्रेरणा देणारे ठिकाण राहिले आहे.
आता या सुट्टीनंतर तो आपल्या कामासाठी पूर्णपणे तयार आहे. 'सप्टेंबर ते डिसेंबर लॉक-इन'मध्ये कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची आशा त्याने व्यक्त केली आहे. "करिअरची वाढ नेहमीच वैयक्तिक वाढ घेऊन येते," असे म्हणत त्याने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.