lifestyle |oats  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात 'या' 3 प्रकारे घ्या ओट्सचा आस्वाद

ओट्स आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही ओट्सपासून विविध पदार्थ तयार करू शकता.

Puja Bonkile

Oats Recipe: ओट्स सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये प्रथिने आणि अनेक प्रकारचे फायबर देखील असतात. तुम्ही ओट्सपासून विविध पदार्थ तयार करू शकता. तुम्ही ओट्स दुधासोबत, ड्रायफ्रुट्ससोबत आणि अगदी दलियाही बनवून खाऊ शकता.

पण आज ओट्सच्या काही हटके रेसिपी जाणून घेणार आहोत. हे पदार्थ बनवाला सोपे असून हेल्दी देखील आहेत.

  • ओट्स उपमा

ओट्स उपमा खाणे फायदेशीर असते. तुम्ही आवडीच्या भाज्या बारीक चिरुन तळून त्यात ओट्स घालू शकता.जीर, मोहरीची भोडणी द्यावी. नंतर एक चमचा तुप घालावे.गरमा गरम ओट्स उपम्याचा आस्वाद घेऊ शकता.

  • ओट्स एग ऑम्लेट

ओट्स एग ऑम्लेट बनवायला खुप सोपे असून हेल्दी देखील आहे. 2 अंडी फोडून घ्या त्यात 2 चमचे ओट्स, कांदे आणि हिरव्या मिरच्या बारिक कापून मिक्स करावे. त्यावर थोडे मीठ, मिरपूड आणि लाल तिखट घालावे.नेहमी जसे ऑम्लेट बनवता तसेच तव्यावर बनवा. हे करण्यासाठी तुम्हाला 8 ते 10 मिनिटे लागू शकतात.

  • ओट्स डोसा

ओट्स डोसा बनवायला खूप सोपा आहे. फक्त हा पदार्थ बनवण्यासाठी आंबवायचे लागेल. नंतर त्याचे पिठ अर्धा तास आधी तयार करावे. तुम्हाला फक्त 1 वाटी ओट्स, 1 वाटी दही आणि थोडे बेकिंग सोडासह मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे लागेल. वरून मीठ आणि मिरपूड घालावे. यानंतर सामान्य डोस्याप्रमाणे तव्यावर डोसा तयार करावा.

  •  ओट्स खाण्याचे फायदे

ओट्स अनेकांचा आवडता नाश्ता आहे. यामुळे ह्रदय निरोगी राहण्यास मदत मिळते. ओट्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत करते. शिवाय ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा लाभदायी ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT