Vitamin B12 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीरावर दिसू लागतात 'ही' 5 लक्षणे, वेळीच व्हा सावध

जेव्हा शरीरात कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता जाणवते कमी होते तेव्हा अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

दैनिक गोमन्तक

आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता देखील सतत चिंतेचा विषय बनत आहे. हे असे जीवनसत्व आहे ज्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. त्याचा परिणाम मेंदूवरही दिसून येतो. कोणत्याही पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे शरीरात काही लक्षणे दिसून येतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक लक्षण असू शकतात, जे वेळेत ओळखणे महत्वाचे आहे.

* हाता-पायात मुंग्या येणे

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे शरीराच्या हात, पाय या भागांमध्ये दिसू शकतात. शरीराच्या या भागांमध्ये एक विचित्र मुंग्या येणे जाणवू लागते. त्याला पिन किंवा सुई देखील म्हणतात. शरीरात इतर कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास अशी लक्षणे दिसू शकतात.

* जिभेवर फोड येणे

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे तुमच्या जिभेवर देखिल दिसु शकतात. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जीभेवर फोड, सूज किंवा लहान लाल पुरळ दिसू शकतात. जीभ गडद लाल देखील दिसू शकते.

त्वचेवर हलके पिवळेपणा दिसने

जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर हलके पिवळेपणा दिसू लागला तर तुम्ही व्हिटॅमिन बी 12 साठी चाचणी घ्यावी. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही त्वचा पिवळी पडते. हा पिवळसरपणा काविळीइतका खोल नसेल, पण फिकट रंग नक्कीच उठताना दिसेल.

डोळ्याची समस्या निर्माण होउ शकते

जर तुम्हाला पाहण्यात त्रास होऊ लागला तर ही समस्या कशामुळे होत आहे याचा अंदाज लावणे कठीण होते. प्रत्येकाच्या फोनचा वापर एवढा वाढला आहे की, पहिले लक्ष त्याकडे जाते की, फोनमध्ये (Mobile) गुंतल्यामुळे डोळे कमकुवत झाले असावेत. परंतु, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे डोळे कमकुवत होऊ शकतात.

चालतांना वेदना होणे

हात आणि पाय दुखणे हे व्हिटॅमिन बी 12 चे लक्षण असू शकते. उठताना किंवा बसतानाही ही वेदना जाणवते. या जीवनसत्वाच्या कमतरतेमध्ये स्नायू दुखणे सामान्य आहे. यासोबतच तुमच्या चालण्याचा वेग आणि चालण्यावरही परिणाम होऊ शकतो.

या पदार्थांचे करावे सेवन

दूध, चीज, दही, अंडी आणि शेलफिश हे व्हिटॅमिन बी12 चे चांगले स्त्रोत आहेत. तसेच, व्हिटॅमिन बी 12 च्या सप्लिमेंट्सचे देखील सेवन केले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking Viral Video! चालत्या ट्रेनमध्येच प्रवाशानं केली लघवी; संतापलेल्या सहप्रवाशांनी घेरलं, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Junta House Demolition: पणजीतील 'जुन्ता हाउस'च्या पाडकामाला लवकरच सुरुवात, चोहोबाजूंनी पडद्याचे संरक्षण; इमारतीतील साहित्य हटवले

Bill Gates AI Warning: 'एआय'मुळे जाऊ शकतो एक अब्ज लोकांचा जीव! बिल गेट्स यांच्या भूमिकेने टेक जगतात खळबळ; नियम बनवण्याची सरकारकडे मागणी

Bicholim: रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर बेकायदा पार्किंग, डिचोलीतील प्रकार; 'सेतू संगम' ते पोलिस क्वार्टर्सपर्यंतच्या वाहतुकीस धोका

अनिल सामंतांनी राजभाषा विषय अभ्यासावा... 

SCROLL FOR NEXT