Angarki Chaturthi 2022: गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' काम

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने अनेक समस्या दूर होउ शकतात.
Angarki Chaturthi 2022
Angarki Chaturthi 2022Dainik Gomantak

हिंदू धर्मात संकष्टी गणेश चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी विधिवत गणेशाची पूजा केली जाते. पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी व्रत ठेवले जाते. दुसरीकडे, मंगळवार असल्यामुळे ती अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही चतुर्थी विशेष मानली जाते.

अंगारकी चतुर्थीच्या (Angarki Chaturthi) दिवशी काही विशेष उपाय केल्याने व्यक्तीला कर्जमुक्ती मिळू शकते. त्यासोबतच आर्थिक संकट दुर होउन कुटुंबात सुख-समृद्धी येऊ शकते. जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावे लागतील.

Angarki Chaturthi 2022
Cooking Tips: गोड खावेस वाटल्यास घरीच तयार करा रबडी मलाई टोस्ट

* कष्ट करूनही यश मिळत नसेल तर गणपतीची पूजा केल्याने फायदा होतो. आज भगवान गणेशाच्या 'श्री गणेशाय नमः ' मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करा, यामुळे तुम्हाला फायदा होईल.

* जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सतत वाढवायचा असेल तर या दिवशी गणपतीला 11 गाठी दुर्वा अर्पण करा. यामुळे व्यवसायात तुमचे नुकसान होणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा सामना करावा लागणार नाही.

* धनवृद्धीसाठी संकष्टी चतुर्थीला गणपतीला मोदक किंवा बुंदीचे लाडू अर्पण करावे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बुधवारीही हा उपाय करू शकता. यामुळे तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

* जर तुम्हाला ऋणातून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी श्रीगणेशाच्या मंदिरात जाऊन त्यांची विधीपूर्वक पूजा करा आणि या मंत्राचा जप करा - ओम गणपतये नमः. यामुळे तुम्हाला धनलाभही होईल.

* तुमचे सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावेत, अशी तुमची इच्छा असेल, तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्यासोबतच या मंत्राचा 11 वेळा जप करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com