Benefits Of Having Black Cardamom Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits Of Black Cardamom: मोठी विलायची चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर

Black Cardamom Benefits: मोठी काळी विलायचीचा वापर अनेक घरांमध्ये मसाला म्हणून वापरली जाते.

Puja Bonkile

Black Cardamom Health Benefits

मोठी विलायचीचा वापर अनेक घरांमध्ये मसाला म्हणून वापरली जाते. पण एक चिमूटभर मोठी विलायची फक्त जेवणाची चव आणि सुगंध बदलत नाही तर त्याचा चहा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मोठी विलायचीचा चहा प्यायल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो.

सर्दी-खोकला

मोठी विलायचीचा चहा सर्दी-खोकल्यासाठी फायदेशीर असतो. मोठ्या विलायचीचे दाणे गरम पाण्यात उकळावे आणि ते गाळून प्यायल्यास कफामुळे येणारा जडपणा दूर होण्यास मदत होते. तसेच सर्दी आणि खोकला कमी होतो.

श्वसनासंबंधित समस्या

मोठी विलायची जेवणात चिमूटभर वापरल्यास श्वसनाचे त्रास दूर होतात. काळ्या विलायचीमध्ये सिनेओल आवश्यक तेल आढळते. जे श्वसनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

पचन

मोठी विलायची खाल्ल्याने पोट फुगणे, अपचन, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. जर काळी विलायची थोड्या प्रमाणात अन्नामध्ये मिसळली तर ते पचन एंझाइम्स सोडण्यास मदत करते. ज्यामुळे पचन लवकर होते आणि फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

मौखिक आरोग्य

मोठी विलायची तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. जे हिरड्यांमधील बॅक्टेरिया नष्ट करतात. मोठी विलायची दातांमध्ये साचलेला प्लेक आणि श्वासाची दुर्गंधी काढून टाकण्यास मदत करते. जेवणानंतर रोज एक मोठी विलायची चघळल्यास श्वासाची दुर्गंधी आणि हिरड्यांमधील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.

हृदयाचे आरोग्य निरोग्य

मोठ्या वेलचीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक संयुगे आढळतात. ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात हानिकारक फ्री रॅडिकल्स विकसित होऊ देत नाहीत. ज्यामुळे रक्तवाहिन्या खराब होण्यापासून वाचवता येतात. मोठ्या विलायचीमध्ये सिनेओल आणि लिमोनेन आवश्यक तेले आढळतात. जे रक्तदाब कमी करण्यास आणि रक्त परिसंचरण वाढविण्यास मदत करतात.

पीरियड क्रॅम्प्स

मासिक पाळीत होणारे क्रॅम्प्स कमी करण्यासाठी मोठी विलायचे सेवन करू शकता. त्याचा वास शरीर आणि मनाला आराम देतो. तसेच स्नायूंचा ताण कमी होतो. जे पीरियड क्रॅम्प्सपासून आराम देते. मासिक पाळी दरम्यान मोठी विलायची वापरल्यास वेदना कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT