Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: सावधान! रात्री झोपतेवेळी तुम्ही देखील 'हे' काम करता? होऊ शकतात 'या' गंभीर समस्या

रात्रीची गाढ आणि शांत झोप ही मेडिकल थेरपीसारखी काम करते.

Ganeshprasad Gogate

Health Tips झोप ही माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. दिवसभराचा थकवा, ताण घालवण्यासाठी रात्रीची 7 ते 8 तासांची झोप आवश्यक ठरते. प्रत्येकाच्या वयानुसार, कामाच्या पद्धतीनुसार झोपेचा कालावधी वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो.

मात्र रात्रीची गाढ आणि शांत झोप ही मेडिकल थेरपीसारखी काम करते. शांत झोपेमुळे तुमचा मेंदू व्यवस्थित काम करतो. तसेच शरीर पुन्हा एकदा रिचार्ज होतं, पुन्हा नवी उर्जा प्राप्त करतं.

तुमचा मूड चांगला राहतो तसेच अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहता. म्हणून झोपताना आपण काही खबरदारी पाळली पाहिजे, अन्यथा यामुळे शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

मात्र काही जणांना रात्री झोपतेवेळी खोलीतील लाईट सुरु ठेवण्याची सवय असते. मात्र काही आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्ही रात्री लाईट सुरू ठेऊन झोपत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

काहीजण मुद्दामहून तर काहीजण आळशीपणामुळे दिवे सुरू ठेवून झोपतात. पण रात्री झोपताना दिवे लावणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरणार असल्याचे सांगितले गेलेय.

नैराश्य येण्याची शक्यता

निरोगी जीवनशैलीसाठी प्रकाशाची गरज असते, पण अंधाराचीही तेवढीच गरज असते. अनेकांना रात्री झिरो बल्ब सुरू ठेऊन झोपण्याची सवय असते. या झिरो बल्बच्या प्रकाशामुळे तुमच्यात चिडचिडेपणा येऊ शकतो.

झोप पूर्ण न झाल्याने थकवा

असं मानलं जातं की रात्री दिवे लावून झोपल्याने झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून येतो. यामुळे तुम्हाला ऑफिसची कामे करण्यात अडचण येऊ शकते. ज्यामुळे तुम्ही सुस्त आणि थकल्यासारखे वाटू शकता.

अनेक आजारांचा धोका असतो

जर तुम्ही लाईट लावून झोपलात तर तुम्हाला शांत झोप येत नाही. यासोबतच अनेक आजारांचा धोका असतो. जसं की उच्च रक्तदाब, हृदयासंबधित समस्या अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणूनच चुकूनही दिवे लावून झोपू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT