Benefits of putting oil in navel Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits of putting oil in navel: नाभीत तेल टाकण्याचे 'हे' अचाट फायदे माहितीयेत? आयुर्वेद सांगते...

आयुर्वेदात ज्याप्रमाणे तेलाने मसाज करण्याचे फायदे आहेत तसेच नाभीत तेल लावण्याचेही अद्भुत फायदे आहेत. अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.

Puja Bonkile

Benefits of putting oil in navel: लहान मुलांची वाढ होण्यासाठी मसाज करणे फायदेशीर मानले जाते. तसेच नाभीत तेलाचे काही थेंब टाकणे देखील फायदेशीर मानले जाते.

आयुर्वेदामध्ये देखील नाभीला तेल लावण्याचे फायदे सांगितले आहेत. नाभि तेल थेरपी  (Navel Oil Therapy) या नावाने इतर अनेक प्राचीन वैद्यकीय ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आहे.

नाभी हा आपल्या शरीराच्या शक्तीचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे नाभीमध्ये तेल लावल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून त्वरित आराम मिळतो.

आजकाल या जुन्या पद्धती विसरून लोक प्रत्येक समस्येवर रसायनांमध्ये उपाय शोधू लागले आहेत. पण हे नैसर्गिक उपाय खूप प्रभावी ठरु शकतात. चला तर मग जाणून घेउया की कोणत्या समस्येमध्ये नाभीत तेल लावल्यास आराम मिळेल.

  • ओठ फाटणे (Crack Lips)

अनेकांना ओठ फाटण्याची समस्या असते. यासाठी आयुर्वेदानुसार झोपण्यापूर्वी नाभीत मोहरीचे तेल लावावे. हा उपाय केल्याने काही दिवसात फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल. काही दिवसांनी तुमचे ओठ गुळगुळीत आणि चमकदार दिसू लागतील.

  • निस्तेज आणि ड्राय त्वचा  (Dull and Dry Skin)

ड्राय आणि निर्जीव त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बदाम तेल वापरणे फायदेशीर मानले जाते. झोपण्यापूर्वी बदाम तेलाचे दोन थेंब नाभीत टाकावे. यामुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत मिळते.

  • मुरुम आणि पुरळ ( Pimples and Acne)

मुरुम, पुरळ यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा वापर नाभीमध्ये टाकण्यास करावा. कडुलिंबाच्या तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम आणि पुरळाची समस्या दूर करण्यास मदत करेल.

  • प्रजनन समस्या (Fertility problem)

प्रजनन क्षमतेची समस्या असलेल्या लोकांनी नाभीमध्ये खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेलामध्ये आढळणारे ट्रायग्लिसराइड्स प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करेल. झोपण्यापूर्वी नाभीत खोबरेल तेलाचे दोन ते चार थेंब टाकून हलक्या हातांनी मसाज करावी.

  • सर्दी-खोकला आणि मासिक पाळीतील समस्या (Cold and Cough)

सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर अल्कोहोलचे काही थेंब नाभीत टाकल्यास फायदा होईल. मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम मिळवण्यासाठी ब्रँडीचा वापर केला जाऊ शकतो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT