Benefits of Pista For Diabetes Patients  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

डायबिटीजच्या रुग्णांनी पिस्ता खावा का? जाणून घ्या

Pista Benefits : जर तुम्ही ड्रायफ्रुट्सबद्दल गोंधळलेले असाल तर मधुमेहाचे रुग्ण पिस्ते सहज खाऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

Pista Benefits : मधुमेही रुग्णांना अनेकदा त्यांच्या खाण्यापिण्याची चिंता असते. काय खावे आणि काय नाही ते समजत नाही. अनेक वेळा लोक चुकून अशा गोष्टी खातात ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. जर तुम्ही ड्रायफ्रुट्सबद्दल गोंधळलेले असाल तर मधुमेहाचे रुग्ण पिस्ते सहज खाऊ शकतात.

बदाम, अक्रोड आणि काजू हे देखील मधुमेही रुग्ण खाऊ शकतात, परंतु मनुका जास्त प्रमाणात खाणे टाळावे. पिस्ता एक असा ड्राय फ्रूट आहे जो खायला खूप चवदार लागतो. भाजलेल्या पिस्त्याची खारट चव आणखी छान लागते.

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही सहज पिस्ता खाऊ शकता. पिस्ता खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. पिस्त्यामध्ये भरपूर पोषक आणि फायबर असतात. याशिवाय अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, कर्बोदके आणि प्रथिने आढळतात. पिस्त्यामध्ये फॅट आणि कॅलरीज खूप कमी असतात. जाणून घ्या पिस्ता खाण्याचे फायदे.

1-मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिस्ता खूप फायदेशीर आहे. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की पिस्ता खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक पातळी, रक्तदाब, जळजळ आणि लठ्ठपणाची समस्या कमी होते.

2-रोज पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. हे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. आपल्याला जास्त भूक लागत नाही, आपण जास्त खाणे टाळतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

3- पिस्त्यात लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे अॅनिमियासारख्या समस्या दूर होतात आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी देखील असते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढते.

4- पिस्त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि झिंक आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. पिस्त्यामध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि झिंक आढळतात, जे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहेत.

5- पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. त्यामुळे पोटाचा आणि पचनाचा त्रास होत नाही. पिस्ता खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. पिस्त्याचा आहारात नक्कीच समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT