Benefits of Fig For Men Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits of Fig : पुरुषांसाठी अंजीर खाणे का आहे फायदेशीर? याच्या नियमित सेवनाने शरीरात होतात हे बदल

जर पुरुषांनी दररोज अंजीर खाल्ल्यास त्यांना एक नाही तर अनेक फायदे मिळू शकतात.

दैनिक गोमन्तक

Benefits of Fig For Men : धावपळीच्या या जीवनात पुरुषांच्या जबाबदाऱ्याही पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे कधी-कधी ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. योग्य आणि निरोगी आहार घेणे फार महत्वाचे आहे, अन्यथा पुरुषांवर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. जर पुरुषांनी दररोज अंजीर खाल्ल्यास त्यांना एक नाही तर अनेक फायदे मिळू शकतात.

अंजीर खाल्ल्याने पुरुषांना होणारे फायदे खालीलप्रमाणे :

  • बद्धकोष्ठतेपासून आराम

अंजीर हे एक फळ आहे जे फायबरचा समृद्ध स्रोत मानले जाते. याचे नियमित सेवन केल्याने अपचनाची समस्या दूर होते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी अंजीर खाणे आवश्यक आहे कारण ते आतड्यांसंबंधीच्या सर्व समस्या दूर करते.

  • वजन कमी करण्यासाठी प्रभावी

अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि ते खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. कमी आहार घेतल्याने वजन हळूहळू कमी होऊ लागते.

  • हृदयरोगापासून बचाव

भारतात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या खूप जास्त आहे, यामध्ये पुरुषही मोठ्या संख्येने आहेत. पुरुष अनेकदा कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहतात आणि जास्त तेलकट पदार्थ खातात, अशावेळी उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेले अंजीर खाल्ल्याने हृदय निरोगी राहते कारण ते रक्तदाब नियंत्रित ठेवते.

  • अंजीर असे खा

अंजीर खाण्याचे अनेक प्रकार आहेत. मात्र, ते कोरडे करून सुक्या मेव्यासारखे खाण्याचा ट्रेंड आहे. जर पुरुषांना या फळाचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर अंजीर रात्री पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी उठून ते रिकाम्या पोटी खावे. काही लोक रात्री झोपण्यापूर्वी ते दुधात मिसळूनही त्याचे सेवन करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT