Benefits of Banana Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits of Banana: रोज सकाळी एक केळी खाण्याचे अनेक फायदे!

Benefits of Banana: पोटॅशियम हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

दैनिक गोमन्तक

Benefits of Eating Banana Everyday: आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपला आहार चौरस असणे गरजेचे असते.

यामध्ये पालेभाज्या, कडधान्ये, फायबर असलेले अन्न याबरोबरच ऋतुनुसार मिळणारी सर्व फळे यांचा समावेश असणे गरजेचे आहे.

या सर्व फळांमध्ये जवळजवळ सर्वच ऋतुमध्ये केळ हे फळ उपलब्ध असल्याचे दिसून येते. बऱ्याचदा आपण आपल्याला खावेसे वाटते म्हणून खातो देखील मात्र रोज सकाळी उठून केळी खाल्ल्याचे काही फायदे शरीराला होतात हे तुम्हाला माहीत आहे का?

चला तर आज जाणून घेऊयात रोज सकाळी केळ खाल्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात.

  • हृदय निरोगी ठेवण्यासाठी

केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, आहारातील फायबर आणि मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्व आढळून येतात.

जे आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाचे ठरते. केळीमध्ये आढळणारे पोटॅशियम हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

  • फायबर

केळीमध्ये मोठया प्रमाणात असणारे फायबर आपल्या आतड्यांसाठी उपयुक्त ठरते आणि अन्न पचनास मदत करते.

केळीच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी होतात आणि पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्यांपासून आपली सुटका होऊ शकते.

  • मूड चांगला ठेवण्यासाठी

केळ्यातील व्हिटॅमिन बी 6 सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या न्यूरोट्रांसमीटर वाढण्यास मदत करून मेंदूच्या आरोग्यास निरोगी ठेवते.

हे न्यूरोट्रांसमीटर आपला मूड चांगला ठेवण्यासाठी देखील महत्वाचा ठरतो.

  • त्वचेला नुकसान होण्यापासून संरक्षण

केळीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रॅडिकल्सशी लढण्यास आणि त्वचेला नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते.

त्यात मॅंगनीज देखील असते, जे कोलेजन निर्मितीस मदत करते. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि तरुण दिसते. त्वचेवर चमक येते.

  • वजनही कमी करण्यासाठी मदत

केळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला सतत भूक लागत नाही.

त्यामुळे सतत खाण्याची सवय सोडण्यास मदत होते. त्यामुळे वजनही कमी करण्यासही मोठी मदत होते.

  • मिड-डे स्नॅक

केळीमध्ये नैसर्गिक प्रकारचे अर्थात ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज साखर असते. याबरोबरच यामध्ये कार्बोहायड्रेटदेखील मोठ्या प्रमाणात आढळून येते.

त्यामुळे यातून शरीराराला त्वरित ऊर्जा मिळते. केळी हे उर्जादायी फळ असल्याने वर्कआऊटच्या आधी आणि मिड-डे स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT