Beauty Tips: आता घरच्या घरी करा Eyebrows! Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Tips: घरीच करता येणार Eyebrows

आपल्या चेहऱ्याला आयब्रोमुळे (Eyebrows) एक विशिष्ट आकार येतो.

दैनिक गोमन्तक

चेहऱ्याच सौंदर्य वाढवण्यासाठी आयब्रो (Eyebrows) हा महत्वाचा घटक आहे. आयब्रोमुळे चेहऱ्याला (Face) एक विशिष्ट आकार येतो. चेहरा अधिक सुंदर दिसतो. आयब्रोचा आकार हा आपल्या चेहऱ्याच्या आकारावर अवलंबून असतो. ज्यांचा की गोल चेहऱ्यासाठी गोल आयब्रो (Eyebrows) चालणार नाहीत त्यासाठी कटकोनी आयब्रो पाहिजे. आयब्रो हा स्त्री सौंदर्याचा महत्वाचा घटक आहे. त्यासंबंधित काही गॅजेट्स (Gadgets) बाजारात उपलब्ध आहेत. जाणून घेवूया या गॅजेट्सबद्दल अधिक माहिती.

आयब्रो स्टेनसिल :

सध्या बाजारात आयब्रो कार्ड म्हणजेच आयब्रो स्टेनसिल उपलब्ध झाले आहेत. या स्टेनसिल मार्फत तुम्ही आयब्रोला (Eyebrows) योग्य तो आकार देऊन, खलील गॅजेट्सच्या मदतीने सहज आयब्रो करू शकता. तसेच याची किंमत आपल्या बजेटमध्ये आहे.

आयब्रो ट्रीमर :

आयब्रो ट्रीमर हा बाजारात कुठेही सहज उपलब्ध होतो. आयब्रो ट्रीमर तुम्ही ऑनलाईन शुद्ध खरेदी करू शकता. पेनलेस आयब्रोसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तुम्हाला कमी वेळेत तयार होऊन कार्यक्रमात किंवा ऑफिसला जातचे असेल तर या गॅजेटचा वापर करू शकता.

थ्रेडिंग मशीन :

थ्रेडिंग मशीन हे एका विशिष्ट पद्धतीने बनवलेले मशीन आहे. यामध्ये आपण ज्या पद्धतीने थ्रेडिंग करतो अगदी त्याच पद्धतीने गुंडाळलेला दोरा असतो, हे मशीन वापरायला अगदी सोपे आणि बाजारात सहजपणे उपलब्ध होणारे आहे. आयब्रो व्यतिरिक्त आपण चेहऱ्यावरचे नको असलेले केस या मशीनद्वारे काढू शकतो. या पद्धतीमध्ये मुळापासून केस उपटून निघतात आणि लवकर येत नाहीत.

वॅक्सिंग :

बाजारात रेडी टू युज वॅक्सिंग स्ट्रिप उपलब्ध आहेत. त्याचा वापर आपण आयब्रो (Eyebrows) करतांना करू शकतो. या पद्धतीने आपण सहज आणि पटकन आयब्रो करू शकतो. याचा वापर करून केस मुळापासून निघतात, त्याचबरोबर डेड स्किनसुद्धा निघून जाते.

आयब्रो पेन्सिल :

अनेक महिलांचे आयब्रो (Eyebrows) दाट असतात तर अनेकांचे आयब्रो हे फारच बारीक असतात. आयब्रो बारीक असले तरी त्यांना एक आकार देणं गरजेचं असतं. जर तुमचे आयब्रो बारीक असतील तर तुम्ही आयब्रो पेन्सिलच्या मदतीने उठावदार करू शकतो. आयब्रो पेन्सिलमध्ये काळा आणि ब्राऊन हे दोन रंग येतात. पण सध्या ब्राऊन रंगाचा जास्त ट्रेंड सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT