Beauty Tips: Buying these cosmetics is a waste of money Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Tips: ही सौंदर्य प्रसाधने खरेदी करणे म्हणजे पैशाची नासाडीच

अनेक सौंदर्य साधनामध्ये (Cosmetics) केमिकल्स असल्याने आपली त्वचा (Skin) खराब होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

आजकाल प्रत्येक महिला (Women) सुंदर दिसण्यासाठी विविध सौंदर्य (Beauty) साधने वापरतात. पण अनेक सौंदर्य साधनामध्ये (Cosmetics) केमिकल्स असल्याने आपली त्वचा (Skin) खराब होऊ शकते. यामुळे त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेवूया.

जर तुमची त्वचा गोरी किंवा सावळी असली तरी चालेल. पण त्वचा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आपण टीव्हीवर महागड्या सौंदर्य साधनांची जाहिरात पाहतो आणि आपण ते सौंदर्य साधने खरेदी करतो. पण त्याचा आपल्या त्वचेवर काय परिणाम होईल याचा विचार न करता पैसे खर्च करतो.

सध्या फेस रोलरचा वापर वाढला आहे. अनेक महिला चेहरा स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करतात. यामुळे चेहऱ्यावरील त्वचा लुझ होते. फेस रोलर वापरण्या एवजी हाताच्या बोटांनी मसाज केल्यास त्वचा लुझ होत नाही.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण शीट मास्कचा वापर करतो. पण काही वेळानंतर त्याचा प्रभाव कमी होतो. यात सीरमचे प्रमाण कमी असल्याने चेहऱ्यावरील धूळ कमी होत नाही. यामुळे तुम्ही जर शीट मास्कचा वापर करत असाल तर तो टाळावा.

जर तुम्ही मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर आणि वाईप्सचा वापर करत असाल तर त्वचेला हानी पोहोचू शकते. यात असलेल्या रासायनिक घटकामुळे त्वचा खराब होऊ शकते. याएवजी तुम्ही जर मेकअप काढण्यासाठी नारळाचे तेल वापरल्यास त्वचेचे आरोग्य चांगले राहते.

त्वचेची नियमितपणे काळजी घेण्यासाठी आपण मॉइश्चरायझर, क्लींजिगचा वापर करतो. पण यात असलेल्या रासायनिक घटकामुळे त्वचेला हानी पोहोचु शकते. याएवजी तुम्ही जर गुलाब जल वापरले तर त्वचा चांगली राहते.

स्क्रब केल्याने त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते. पण स्क्रबचा अतिवापर केल्याने त्वचा कोरडी पडू शकते. यामुळे आठवड्यातुन दोन वेळा स्क्रब करावे. यासाठी तांदळाचे पीठ दुधात भिजवून चेहऱ्यावर लावावे. 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यास चेहऱ्यावरील डेड स्कीन कमी होऊन चमकदार दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT