निरोगी आरोग्यासाठी आपण नेहमी सकस (Healthy Food) आहारावर लक्ष केंद्रित करतो. पण निरोगी पेय (Immunity Booster Drink) देखील आरोग्यासाठी (Health) तेवढेच महत्वाचे आहे. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड (Hydrated) ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारची खनिजे आणि जीवनसत्वे (Vitamins) मिळतात. याशिवाय आपण अनेक प्रकारची औषधीयुक्त वनस्पतिचे सेवन करू शकतो. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यास आणि अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतो. कोरोनाच्या काळात निरोगी पेयांचा आहारात समावेश करावा असा सल्ला आरोग्य तज्ञ देतात.
* अश्वगंधा
अश्वगंधा हे एक औषधी वनस्पती आहे. अनेक आजारांच्या उपचारासाठी औषधे तयार करण्यासाठी आयुर्वेदात शतकांपासून याचा वापर केला जात आहे. आयुर्वेदिक औषधी वनस्पतीमध्ये अमिनो ॲसिड, पेप्टाइड्स, लिपिड आणि न्यूक्लिक अॅसिड गुणधर्मांनी समृद्ध असते. आपल्या शरीराची रोगप्रतिकाशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. अश्वगंधाचे नियमित सेवन केल्याने तणाव, चिंता आणि कमी झोप या सारख्या समस्यांवर उपयुक्त आहे.अश्वगंधा हे एक औषधी वनस्पती आहे. अनेक आजारांच्या उपचारासाठी औषधे तयार करण्यासाठी आयुर्वेदात शतकांपासून याचा वापर केला जात आहे. आयुर्वेदिक औषधी वनस्पतीमध्ये अमिनो ॲसिड, पेप्टाइड्स, लिपिड आणि न्यूक्लिक अॅसिड गुणधर्मांनी समृद्ध असते. आपल्या शरीराची रोगप्रतिकाशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. अश्वगंधाचे नियमित सेवन केल्याने तणाव, चिंता आणि कमी झोप या सारख्या समस्यांवर उपयुक्त आहे.
* तुळशीच्या मंजुळा
तुळस ही एक औषधीयुक्त वनस्पती आहे. तुळशीमध्ये ओमेगा-3 फैटी ॲसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के,तसेच कॅल्शियम, फास्फोरस, मैग्नीशियम, लोह यासारखे पोषक तत्वे असतात. तुळशीच्या मंजुळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक्स असतात. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. पचन क्रिया सुरळित राहण्यासाठी तुळशीच्या मंजुळा गरम पाण्यात भिजवून रोज रात्री दुधासोबत घ्यावे. म्हणूनच तुळशीच्या मंजुळांचे सेवन केल्याने आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
* ब्राम्ही
अश्वगंधाप्रमाणेच ब्राम्ही औषधी वनस्पतीला आयुर्वेदात खूप महत्व आहे. यावनस्पतीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतात. या औषधीयुक्त वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते. यामुळे मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरते.
* बडी सोप
सुगंधी बडी सोपमध्ये ट्रान्स- एनेथोल असते. यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. बडी सोपचे पाणी प्याल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळून जळजळ कमी होण्यास मदत होते. बडी सोपमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. यामुळे निरो आरोग्य राखण्यासाठी बडी सोपचे सेवन अवश्य करावे.
* खसखस
उन्हाळ्याच्या दिवसांत ताजे आणि चवदार असे पेय आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. खसखसमध्ये अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध असून जस्तचे मुबलक असते. खसखसचे सेवन केल्याने शरीरावरील जखम लवकर भरून येण्यास मदत करते. खसखसचे सेवन केल्यास् आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.