Ayurveda Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ayurveda Tips: दही खाताना चुकूनही करु नका या चुका,अन्यथा

आयुर्वेदात दही खाण्याचे काय नियम सांगितले आहे हे जाणून घेउया.

दैनिक गोमन्तक

अनेकांना दही खायला खुप आवडते. उन्हाळ्यात दह्याचे अधिक सेवन केले जाते. उन्हाळ्यात भारतीय लोकांच्या ताटात दही आणि ताक यांना विशेष स्थान असते. तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर असते. लोक विविध प्रकारे दही खातात. कोशिंबीरपासून दही भातापर्यंत अनेक रेसिपी बनवल्या जातात. पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासोबतच दही रोगप्रतिकारशक्तीही वाढवते. पण आयुर्वेदानुसार दही खाण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे आरोग्य खराब होउ शकते.

दह्यामध्ये असे अनेक बॅक्टेरिया आढळतात, जे आपल्या पोटासाठी चांगले असतात. याशिवाय जे लोक लॅक्टोज इन्टॉलरेंट आहेत, ते दुधाऐवजी दही खाऊ शकतात. दही तुमच्या शरीरातील कॅल्शियमची गरज पूर्ण करते.

दह्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, बी 12, व्हिटॅमिन A, रायबोफ्लेविन, पेंटोथेनिक अॅसिड आढळतात. त्यात लॅक्टिक अॅसिड असते, ज्याच्या मदतीने शरीर पोषक तत्वे शोषून घेते. ज्यां लोकांना दही (Curd) आवडते ते कधीही खातात. पण आयुर्वेदानुसार (Ayurveda Tips) दही खाण्याचे आणि त्यातून जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी काही नियम आहेत.

आयुर्वेदानुसार दही चवीला आंबट आणि त्याचा गुणधर्म उष्ण असून पचायला जड असते. यामुळे वजन वाढते, शक्ती वाढते, कफ आणि पित्त वाढते तसेच पचनशक्ती वाढते. दही गरम करू नये, अन्यथा त्यातील पोषक घटक नष्ट होतात.

1) जे लोक लठ्ठ आहेत, कफाची समस्या आहे, ज्यांना रक्तस्रावाचा विकार आहे किंवा जळजळ होण्याची समस्या आहे, त्यांनी दही खाऊ नये.

2) दही रात्री कधीही खाऊ नये.

curd

3) दही रोज खाऊ नये. जर तुम्हाला दही आवडत असेल तर रोज ताक प्या आणि त्यात काळे मीठ, काळी मिरी आणि जिरे घालायला विसरू नका.

4) दह्यात फळे (Fruits) कधीही टाकू नका. जर तुम्ही हे दीर्घकाळ केले तर चयापचय समस्या आणि एलर्जी देखील होऊ शकते.

5) दही मांस (Fish) किंवा मासेसोबत खाऊ नये. चिकन, मटण किंवा मासेसोबत दह्याचे मिश्रण शरीरासाठी विषारी असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT