Avoid Morning Mistakes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Avoid Morning Mistakes: सकाळच्या 'या' 5 सवयी टाळा, अन्यथा पडाल आजारी

5 Mistakes to Avoid in Morning: निरोगी राहायचे असेल तर आजच या सवयी बंद करा.

Puja Bonkile

5 Mistakes to Avoid in Morning: तुमची लाइफस्टाइल जितकी चांगली तितके तुमचे आरोग्य चांगले राहते. उठल्यापासून ते झोपणे, खाणे-पिणे, व्यायाम या सर्व गोष्टींचा आरोग्यावर परिणाम होतो. अनेक वाईट सवयींमुळे गंभीर आजारही उद्भवू शकतात. 

जर तुम्ही सकाळी काही काम केले तर तुम्ही सतर्क राहायला पाहिजे. कारण या सवयींमुळे तुम्ही आजारी पडू शकता. चला जाणून घेऊया सकाळी उठल्यावर काय करणे आरोग्यासाठी घातक असू शकते.

  • मोबाइल वापरणे

अनेकांना सकाळी उघडल्यावर मोबाईल पाहण्याची सवय असते. तुमचा मोबाइल बेडच्या शेजारी ठेवून झोपणे आणि सकाळी उठल्याबरोबर तो पाहणे, तुमचा खूप वेळ वाया घालवू शकते.

यामुळे थकवा आणि डोक्यात जडपणा येऊ शकतो. यामुळे दिवसाची सुरुवातही खराब होऊ शकते.

  • कामाचे प्लॅनिंग न करणे

असे बरेच लोक आहेत जे कोणत्याही कामाचे प्लॅनिंग न करता दिवसाची सुरुवात करतात. यामुळे लोकांना नेहमी तणाव, चिंता आणि अस्वस्थता वाटते.

त्यांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रक्तदाबासारखे आजारही होऊ शकतात. यामुळे निरोगी राहण्यासाठी नेहमी कामाचे प्लॅनिंग करावे.

  • नकारात्मक विचार

सकाळी उठल्यानंतर केव्हाही तुम्हाला चिडचिड आणि उदास वाटत असेल तर दिवस चांगला जात नाही असे तुम्हाला वाटेल. कोणतेही काम नीट होत नाही. अशावेळी सकाळी उठल्यानंतर कधीही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका.

  • व्यायाम न करणे

अनेक लोक सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणे टाळतात. अशावेळी तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जे लोक व्यायाम करत नाहीत ते लठ्ठपणा आणि आरोग्याशी संबंधित आजारांना बळी पडू शकतात, जे खूप गंभीर असू शकतात.

  • नाश्ता न करणे

अनेकजण सकाळी उठल्यानंतर लवकर तयार होऊन कामावर निघून जातात. यामुळे सकाळी नाश्ता करत नाही. असे करणे अत्यंत चुकीचे आहे. असे केल्याने अशक्तपणा येतो आणि अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT