fruits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'ही ' फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा

अनेक फळे (fruits) फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होतात

Dainik Gomantak

Health Care Tips - अनेकजन भाज्यासोबत फळ (Fruits) देखील फ्रीजमध्ये ठेवतात. असे केल्यास फळ बराच वेळ ताजी राहून खराब होणार नाही असे त्यांना वाटते. परंतु असे काही नसते. उलट फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास आरोग्यास (Health) धोकादायक ठरू शकते. फळे फ्रीजमध्ये ठेवणे चुकीचे आहे. अनेक फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होतात. रसाळ फळे (Juicy fruits)फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. अशी फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास आरोग्यास फायदा होण्याएवजी नुकसानच होऊ शकते. आज जाणून घेऊया कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवावी

केळी -

हे फळ चुकूनही फ्रीजमध्ये ठेऊ नका. फ्रीजमध्ये ठेवल्यास फळे काळी पडू शकतात. हे फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील इथिलीन गॅस बाहेर पडतो. त्यामुळे फ्रीजमधील इतर फळे लवकर पिकतात. म्हणूनच केली कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये.

टरबूज- खरबूज

टरबूज या फळात मुबलक प्रमाणात पाणी असते. यामुळे उन्हाळ्यात हे फळ भरपूर प्रमाणात खाल्या जाते. परंतु हे फळ आकाराने खूप मोठे असल्याने एकाच वेळी संपवणे कठीण असते. या वेळी बरेच लोक टरबूज- खरबूज हे फळ कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतात. असे करणे चुकीचे आहे. टरबूज - खरबूज यासारखी रसाळ फळे कापून फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. हे फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील अँटीऑक्सिडंट नष्ट होण्याची शक्यता असते. परंतु तुम्हाला हे फळ जर थंड करून खायचे असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेऊ शकता .

सफरचंद -

सफरचंद हे फळ आरोग्यास लाभदायी असते. हे फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर पिकू शकते. सफरचंदात असलेल्या एन्झाईम्समुळे ते वेगाने पिकते. यामुळेच ते काळे देखील पडू शकते. सफरचंद फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. या फळाला जास्त वेळ टिकून ठेवायचे असेल तर त्याला कागदात ठेवावे. तसेच बिया असणारी फळे जसे की, चेरी , पीच हे देखील फळ फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे.

आंबा -

फळांमध्ये आंबा हे फळ फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आंबा फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट कमी होऊ शकतात. यामुळेच त्या फळातील पोषाक तत्वे नष्ट होतात. या फळाला कार्बाईडनेपिकवल्या जाते. यामुळेच कार्बाईड पाण्यात मिसळल्यास हे फळ लगेच खराब होऊ शकते.

लिची -

लीची हे फळ चवीला कुप स्वादिष्ट असते. पण चुकूनही हे फळ फ्रीजमध्ये ठेऊ नका. लीची फळाला फ्रीजमध्ये ठेवल्यास ते वरुण त चांगले राहते परंतु त्याचा आतील भाग खराब होऊ शकतो. त्यामुळेच फळ खाण्या योग्य देखील राहत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT