Don't Drink Water After Eating This:: शरीर निरोगी ठेवण्यासाठी भरपुर पाणी पिणे गरजेचे आहे. प्रत्येकाने दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
पण पिण्याचे पाणी हवामान आणि शारीरिक श्रमावर अवलंबून असते. पण पाणी पिण्याचेही अनेक नियम आहेत. काही पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
फळ
कोणतेही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असते. तसेच साखर, सायट्रिक अॅसिड असते.
त्यामुळे कोणतेही फळं खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पोटाची समस्या ही त्यापैकी एक आहे. त्यामुळे फळं खाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.
आईस्क्रीम
उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला खुप सर्वांनाच आवडते. पण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य नाही. ते फायदेशीर ठरणार नाही. उलट ते हानिकारक असू शकते.
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने अनेकांचे दात किडतात. दातांची ताकदही कमी होऊ शकते. त्यामुळे घसा खवखवणे देखील होऊ शकते. त्यामुळे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर 15 मिनिटांनी पाणी प्यावे.
चहा-कॉफीनंतर
अनेक लोकांना चहा पिणे फार आवडते. सकाळ-दुपार चहा पिण्याची ठराविक वेळ नाही! अनेक लोक हवा तेव्हा चहा-कॉफी पितात. ही दोन पेये सहसा बरेच लोक खूप गरम गरम पितात.
त्यामुळे पचनक्रिया मंदीवते. तुम्ही चहा-कॉफी गरम किंवा थंड कशीही प्यायली असो, त्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. तसेच गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याने देखील घसा खवखवणे होऊ शकते.
चणे
चणे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. कारण चणे पचण्यासाठी भरपूर एन्झाईम्स लागतात. पाणी प्यायल्याने त्याचे प्रमाण लगेच कमी होते. हे एन्झाइम त्यात विरघळते. परिणामी, चणे पचायला जास्त वेळ लागतो. पोटाशी संबंधीत आजार होउ शकतात. त्यामुळे चणे खाल्ल्यानंतर किमान २० ते २५ मिनिटांनी पाणी प्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.