Astro Tips Dainik Gomantak 
लाइफस्टाइल

Astro Tips: घरातील अशांतता दूर करण्यासाठी 'हे' उपाय करा

गोमन्तक डिजिटल टीम

प्रत्येकाला आयुष्यात सुख आणि शांती हवी असते. यासाठी सर्वजण देवाचा धावा करतात. पण, नकळत आपण काही अशा गोष्टी करतो ज्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. आपण आपल्या नशिबाला दोष देतो.

आपण दैनंदिन जीवनात नकळत केलेल्या चुकीच्या गोष्टींचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या गोष्टींबाबत ज्योतिषशास्त्रात काही नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचे पालन केल्याने तुम्हाला जीवनातील त्रास कमी होऊन आनंद मिळू शकतो.

'हे' उपाय करा

ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर रविवारी उंबराच्या झाडाची पूजा करा. यामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल.

रोज सूर्योदयाच्या वेळी पूर्वेला तोंड करून रुद्राक्षाच्या माळा घालून सूर्यासमोर गायत्री मंत्राचा जप केल्याने भाग्य उजळते.

पुजा पाठासाठी वापरलेल्या फुलांचा किंवा इतर साहित्याचा अवमान करू नका. सुकलेली फुले वाहत्या पाण्यात अर्पण करा. ते शक्य न झाल्यास खड्डा खोदून त्यात टाका.

वास्तुशास्त्रानुसार नेहमी पूर्व दिशेला बसून भोजन केल्याने जीवनात सुख प्राप्ती होते.

घरी रोज नित्यनेमाने पूजा करावी. पूजा केल्यानंतर रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

महादेवाला अभिषेक केल्याने भाग्यातील बाधा दूर होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT