Astrology Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astrology: आठवड्यातील कोणत्या दिवशी नवे कपडे घालणे मानले जाते शुभ, वाचा सविस्तर

हिंदू धर्मात नवीन कपडे खरेदी आणि कधी घालावे यासाठी अनेक नियम सांगितलेले आहेत.

Puja Bonkile

Astrology Tips For New Cloths: शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही. खासकरून महिलांमध्ये शॉपिंगची क्रेढ जास्त असते. तसेच प्रत्येक कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये नवे कपड घालण्याची आवड देखील महिलांना जास्त असते. पण ज्योतिष शास्त्रानुसार शुभ दिवस केवळ शुभ कार्यांसाठीच नाही तर कपड्यांसाठीही ठरवले गेले आहेत.

त्यामुळे नवीन कपडे घालण्यापूर्वी शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्र आठवड्यातील काही दिवसांबद्दल सांगितले आहे. ज्यामध्ये नवीन कपडे घालणे शुभ असते तर काही दिवस अशुभ असतात.

कारण आठवड्यातील प्रत्येक दिवस हा ग्रहांशी संबंधित असतो. याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. त्यामुळे नवीन कपडे घालताना कोणता दिवस निवडावा हे जाणून घेऊया.

मंगळवार

मंगळवारी चुकूनही नवीन कपडे घालू नका. कारण तो मंगळाचा दिवस आहे. मंगळाच्या प्रभावामुळे व्यक्तीमध्ये क्रोध आणि वादाची भीती वाढते. याशिवाय शनिवार आणि रविवारी नवीन कपडे घालण्यास मनाई आहे. असे म्हणतात की या दिवसात कपडे घातल्यास आजार वाढू शकतात.

शुक्रवार

ज्योतिषशास्त्रामनुसार नवीन कपडे घालण्यासाठी शुक्रवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. शुक्र ग्रह भौतिक सुख, संपत्ती आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. त्यामुळे नवीन कपडे घालण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. शुक्रवारच्या शुभ दिवशी नवीन कपडे घालणेच नव्हे तर नवीन कपडे खरेदी करणे देखील खूप शुभ आहे.

या दिवशी नवे कपडे घातल्यास काय होईल?

हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो की, रविवार, शनिवार, मंगळवारी नवीन कपडे घालणे आवश्यक असेल तर अशावेळी काय करावे. याचे उपाय ज्योतिषशास्त्रातही सांगितले आहेत. अशुभ दिवशी नवीन कपडे घालायचे असल्यास सोमवार, बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवार अशा शुभ दिवशी काही वेळा ट्रायल म्हणून कपडे घालावेत आणि ते काढून व्यवस्थित ठेवावेत.

यामुळे कपड्यांशी संबंधित दोष दूर होतात. कपडे नवीन ठेवायचे असतील आणि ट्रायल म्हणूनही घालायचे नसतील तर नवीन कपड्यांवर थोडे पाणी शिंपडावे. असे केल्याने कोणताही दोष निर्माण होत नाही.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राहुल गांधींची 'जादूगार' टीपण्णी अन् भाजपचा पलटवार, लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले; राजनाथ सिंहांची माफीची मागणी

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

SCROLL FOR NEXT