Astro Tips About Broom Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips: लक्ष्मीचा वास असणाऱ्या 'झाडू' संबधित 'या' चुका तर तुम्ही करत नाहीत ना?

जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात झाडू बद्दल काय सांगितले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Astro Tips About Broom: स्वच्छ घरात देवी-देवतांचा आणि विशेषत: लक्ष्मीचा वास असतो. त्यासाठी नियमितपणे घराची स्वत्छता करण्याला महत्व दिले जाते. घराच्या स्वच्छतेसाठी आपण झाडूचा वापर करतो आणि हिंदू धर्मात लक्ष्मीचा वास झाडूमध्ये असतो असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रातही झाडूशी संबंधित अनेक मान्यता सांगितल्या आहेत. झाडू संबंधित या गोष्टींची योग्य काळजी न घेतल्यास घरात गरीबी किंवा दारिद्र्य येऊ शकते असे मानले जाते. त्यामुळे झाडू संबधित ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवणे अतिशय गरजेचं आहे.

झाडूला पाय लागला तर काय करावे?

ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये झाडूबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. कधी कधी झाडूवर आपला पाय पडतो. पण, झाडूवर पाय ठेवणे हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो. तुमचा पाय कधी झाडूला लागला तर, हाताने झाडूला स्पर्श करून माता लक्ष्मीची क्षमा मागा. किंवा झाडू कपाळाला लावत माफी मागा. असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

झाडू संबंधित इतर काही नियम

वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे झाडू कधीही उभा ठेवू नये. नेहमी खाली पडून ठेवावा. उभ्या ठेवलेल्या झाडूमुळे घरात समस्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला अनेक त्रासांना सामोरे जावे लागू शकते. अशी मान्यता आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरात वापरण्यात येणारा कधीच झाडू तोडू नये. घरातील झाडू तुटला किंवा खराब झाला तर तो लगेच बदलण्यात यावा. याशिवाय शुक्रवारी आणि गुरुवारी झाडू घराबाहेर फेकू नका हे लक्षात ठेवा.

सूर्यास्तानंतर घरात झाडू वापरू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने घरात आर्थिक समस्या उद्भवू शकतात. घराच्या दक्षिण-पश्चिम किंवा दक्षिण दिशेला झाडू ठेवल्यास आयुष्यात कधीही धनाची हानी होत नाही. असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

झाडू कधीही कपाटाच्या मागे किंवा तिजोरीच्या मागे ठेवू नये. असे मानले जाते की यामुळे धनाची हानी होण्याची शक्यता वाढते. असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT