Hair Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Care Tips: घनदाट व लांब केसांसाठी घरच्या घरी बनवलेले 'हे' तेल लावा

बाजारातून महागडे आणि भेसळयुक्त हेअर ऑइल विकत घेण्याऐवजी तुम्ही घरी थोडे तेल बनवून केसांना लावू शकता.

गोमन्तक डिजिटल टीम

केसांची काळजी (hair care) घेण्यासाठी त्यांना नियमितपणे तेल लावून मालिश करणे महत्वाचे ठरते. बाजारात अनेक तेल (hair oil) उपलब्ध आहेत, जे केसांसाठी फायदेशीर ठरतात असा दावा केला जातो, मात्र त्यामुळे केसांना खूप फायदा मिळत नाही. बाजारातून महागडे आणि भेसळयुक्त हेअर ऑइल विकत घेण्याऐवजी तुम्ही घरी थोडे तेल (homemade oil for hair growth) बनवून केसांना लावू शकता.

कढीपत्त्याचे तेल-

हे तेल बनवण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन गरम करावे. त्यानंतर कढीपत्त्याची स्वच्छ धुतलेली काही पाने या तेलात घालून तेल चांगले उकळू द्यावे. गार झाल्यावर हे तेल गाळून घ्यावे आणि एका बाचलीत भरून ठेवावे. या तेलाने केसांना नियमितपणे मालिश करावे. या तेलाच्या वापराने केस काळे होतातच पण दीर्घकाल काळेही राहतात.

कांद्याचे तेल-

कांदा हा केसांसाठी उत्तम ठरतो. कोणत्याही रसायनाशिवाय कांद्याचे तेल घरी तयार करण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल गरम करा आणि त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा शिजल्यानंतर हे तेल गाळून बाटलीत ठेवावे. व नियमितपणे त्याचा वापर करावा.

आवळ्याचे तेल-

हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला बेस ऑइलसाठी खोबरेल तेल वापरावे लागेल. एका मोठ्या भांड्यात शुद्ध खोबरेल तेल गरम करावे. यामध्ये तुम्हाला ताज्या आवळ्याऐवजी वाळलेल्या आवळ्याचा वापर करावा लागेल. वाळलेल्या आवळ्याचे बारीक तुकडे करून या तेलात घालावेत. मात्र हे तेल लगेच वापरू नका. हे तेल बाटलीत घालून 12 ते 15 दिवस उन्हात ठेवावे लागते. थोड्याच दिवसात तुमचे तेल वापरासाठी तयार होईल.

कलौंजीचे तेल-

काळ्या रंगाची कलौंजी ही केसांसाठी चांगली असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक, लोह आणि पोटॅशिअम देखील आढळते, जे केसांना पूर्ण पोषण देऊन वाढण्यास मदत करते. हे तेल बनवण्यासाठी नारळाच्या तेलाशिवाय ऑलिव्ह ऑईलचाही वापर करता येतो. भांड्यात तेल उकळल्यानंतर त्यात एक चमचा कलौंजी टाकावी. थोड्या वेळाने तेल गाळून बाटलीत भरून केसांसाठी नियमितपणे वापरा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT