iPhone Upcoming Feature Dainik Gomantak
लाइफस्टाइल

iPhone Upcoming Feature: आयफोनमध्ये लवकरच येणार AI फिचर

पण लवकरच Apple iPhone मध्ये AI फीचर लाँच करणार आहे. Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी पुष्टी केली आहे,

Puja Bonkile

apple ceo tim cook ai feature coming iphone

सगळ्याच क्षेत्रांमध्ये AIचा वापर वाढत चालला आहे. गुगल आणि सॅमसंगने त्यांचे एआय फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच केले आहेत. तुम्हाला Google Pixel 8 आणि Samsung Galaxy S24 सीरीजमध्ये अनेक AI वैशिष्ट्ये मिळतात. या फिचर्समुळे ॲपल कुठेतरी मागे पडत आहे. ॲपलच्या लेटेस्ट फोन्समध्ये असे कोणतेही AI फीचर देण्यात आलेले नाही.

पण लवकरच Apple iPhone मध्ये AI फीचर लाँच करणार आहे. Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी पुष्टी केली आहे, की कंपनी जनरेटिव्ह एआय सॉफ्टवेअर फिचरवर काम करत आहे. म्हणजेच आयफोनमध्ये AI फीचर वापरता येणार आहे.

ॲपलचे एआय फीचरवर काम सुरू

या आठवड्यात आयोजित ॲपल क्वार्टल अर्निंग कॉलमध्ये या फिचरबद्दल बोलले गेले. टीम कुकने या बैठकीत सांगितले की ते जनरेटिव्ह एआय सॉफ्टवेअर फीचरवर काम करत आहेत. या वर्षाच्या अखेरीस ही सुविधा गयूजर्ससाठी उपलब्ध होऊ शकतात. जनरेटिव्ह AI वर अॅपलच्या कामाची माहिती समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी मार्क गुरमनने माहिती दिली होती की iOS 18 Apple च्या iOS हिस्ट्रीमध्ये सर्वात मोठे अपडेट असू शकते. याचा अर्थ iOS 18 मध्ये AI फिचर मिळू शकते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आयफोनमध्ये कोणताही नवीन इनोव्हेशन नसल्यानेअॅफलच्या विक्रित घट होऊ शकते असे विश्लेषक मिन-ची कुओचा अंदाज आहे. इतर ब्रँडने फोल्डेबल फोन, फ्लिप फोन आणि AI फिचरसह फोन लाँच केले आहेत. तर ॲपल असा कोणताही फोन देत नाही.

ॲपलच्या सीईओने केलेली ही घोषणा स्मार्टफोन उद्योगात बदल घडवून आणू शकते. सध्या ॲपल स्मार्टफोन बाजारात आघाडीवर आहे. टिम कुकने त्यांच्या भाषणात अनेक वेळा जनरेटिव्ह एआयचा वापर केला. मात्र, त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT