Angaraki Sankashti Chaturthi Muhurat: हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते. चैत्र महिना हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना असल्याने यातील चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. यावर्षी, ही चतुर्थी मंगळवारी येत असल्यामुळे ती अंगारकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल, ज्यामुळे तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.
ज्योतिष पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी १ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ५ वाजून ४२ मिनिटांनी सुरू होऊन २ एप्रिल २०२५ रोजी पहाटे २ वाजून ३२ मिनिटांनी समाप्त होईल. गणेश पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ११:१० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत आहे.
अंगारकी चतुर्थीचे महत्त्व अनेक कारणांमुळे वाढते. मंगळवार हा दिवस साहस, ऊर्जा आणि शक्तीचा प्रतीक असलेल्या मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्यास मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. व्रत आणि पूजनाने कर्जमुक्ती मिळते, आजारांपासून सुटका होते आणि घरात सुख-शांती नांदते.
या दिवशी व्रत करणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
व्रताचे नियम: मनात नकारात्मक विचार आणू नयेत. खोटे बोलणे, अपशब्द वापरणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास निर्जला व्रत करावे किंवा फलाहार ग्रहण करावा.
पूजा विधी: ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्य असल्यास लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला. त्यानंतर गणपतीची मूर्ती चौरंगावर स्थापित करावी. मूर्तीला कुंकू, गुलाल, चंदन, फुले, हार, अक्षता आणि २१ दुर्वा अर्पण कराव्यात. त्यानंतर मोदकांचा नैवेद्य दाखवावा आणि तुपाचा दिवा व कापूर लावून आरती करावी. संध्याकाळी चंद्रदर्शन करून अर्घ्य दिल्यानंतरच व्रत सोडावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.