लिंबू सरबत हे केवळ ताजेतवाने करणारे पेय नाही, तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. चला तर मग, जाणून घेऊया लिंबू सरबत पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.
लिंबू सरबत शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवते. उन्हाळ्यात घामाच्या स्वरूपात शरीरातील पाणी कमी होते, अशावेळी लिंबू सरबत इलेक्ट्रोलाइट्स पुरवते आणि शरीर हायड्रेट राहते.
लिंबामध्ये सिट्रिक अॅसिड असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. लिंबू सरबत अपचन, गॅस आणि अॅसिडिटी यांसारख्या तक्रारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
लिंबू सरबतात असलेले अँटीऑक्सिडंट्स मेटाबॉलिझम वाढवतात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून घेतल्यास वजन घटण्यास मदत होते.
लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. नियमित लिंबू सरबत प्यायल्याने सर्दी, ताप आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
लिंबातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C त्वचेला उजळ, तजेलदार आणि आरोग्यदायी ठेवतात. लिंबू सरबत मुरुम, डाग आणि काळे ठिपके कमी करण्यास मदत करते.
लिंबू सरबत हे नैसर्गिक डीटॉक्स ड्रिंक आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून यकृत (Liver) निरोगी ठेवते.
उन्हाळ्यात लिंबू सरबत हीटस्ट्रोक आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी उत्तम उपाय आहे. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर लिंबू सरबत पिणे फायदेशीर ठरते.
लिंबूमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी लिंबू सरबत फायदेशीर ठरू शकते.
लिंबूचा रस एका बाऊलमध्ये काढा. लिंबाच्या रसामध्ये साखर किंवा मध घाला. साखर पूर्णपणे विरघळेल याची खात्री करा. मिश्रणात १ ग्लास पाणी घाला आणि चांगलं मिक्स करा. चिमूटभर मीठ आणि जिरे पावडर (ऑप्शनल) घालून चांगलं मिक्स करा.त्यात बर्फाचे तुकडे घालून थोडं थंडगार आणि ताजं सरबत तयार करा. जर तुम्हाला सरबत जास्त गोड हवं असल्यास साखर अधिक घालू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.