Health: जास्त तेल खात असाल सावधान...! हृदयरोग, मधुमेह अन् कर्करोगासारख्या आजारांना देऊ नका आमंत्रण

Health Risks Of Excess Oil And Spices: अन्नात तेलाचा जास्त वापर केल्याने अनेक आजार होऊ शकतात. तेलाचा जास्त वापर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकते, ज्यामुळे हृदयरोग होऊ शकतो.
Health: जास्त तेल खात असाल सावधान...! हृदयरोग, मधुमेह अन् कर्करोगासारख्या आजारांना देऊ नका आमंत्रण
Health Risks Of Excess Oil And SpicesSocialMedia
Published on
Updated on

Health Risks Of Excess Oil And Spices: आजच्या धकाधकीच्या आयुष्यात खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमधील बदलांमुळे लोक मोठ्याप्रमाणावर आजारी पडत आहेत. यामध्ये तरुणांचाही समावेश आहे. भारतात चुकीच्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार झपाट्याने वाढत आहे. अलिकडेच, उत्तराखंडमध्ये फिट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते की, आपल्या देशात लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक वयोगटातील लोक लठ्ठपणाचे शिकार ठरत आहेत. लठ्ठपणामुळे हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढत आहे.

व्यायाम आणि पौष्टिक खाद्यान्न

पंतप्रधान पुढे म्हणाले होते की, 'आज मी देशवासियांना दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतो, एक म्हणजे व्यायाम आणि दुसरी म्हणजे आहार. दररोज, व्यायामासाठी थोडा वेळ काढा आणि पौष्टिक अन्नाचे सेवन करा. जर आपण दररोज आपल्या जेवणात तेलाचे प्रमाण 10 टक्के कमी केले तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. ही छोटी पावले उचलून आपण आपले आरोग्य निरोगी राखू शकतो. निरोगी शरीरच निरोगी मन आणि निरोगी राष्ट्र निर्माण करु शकते.' पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अन्नात जास्त तेल (Oil) वापरल्याने होणाऱ्या आजारांबद्दल चर्चा सुरु झाली आहे. चला तर मग जास्त तेल खाल्ल्याने कोणते आजार होतात ते जाणून घेऊया...

Health: जास्त तेल खात असाल सावधान...! हृदयरोग, मधुमेह अन् कर्करोगासारख्या आजारांना देऊ नका आमंत्रण
Diabetes: तुम्ही प्री-डायबिटीज स्टेजमध्ये असाल तर लगेच करा आहारात 'हे' बदल; आजारचा धोका टाळण्यास होईल मदत

अनेक घरांमध्ये जास्त तेल खाणे हा ट्रेंड बनला

आजकाल बहुतेक घरांमध्ये जास्त तेल आणि मसाल्यांचा वापर हा एक ट्रेंड बनला आहे. आजूबाजूचे लोक चर्चा करतात की, शेजारच्या घरात दरमहा 5 ते 6 लिटर तेलाचा वापर होतो आणि भाज्यांमध्येही जास्त मसाले वापरले जातात. लोकांना वाटते की जास्त तेल आणि मसाले खाणे हे उच्च दर्जाचे आहे, परंतु त्यांना हे माहित नाही की या तेल आणि मसाल्यांमुळे ते आज अनेक आजारांना बळी पडत आहेत. यामध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हर सारख्या आजारांचा समावेश आहे.

तज्ञ काय सांगतात?

तज्ञांच्या मते, अन्नात तेलाचा जास्त वापर केल्याने अनेक आजार होऊ शकतात. तेलाचा जास्त वापर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकते, ज्यामुळे हृदयरोग होऊ शकतो. तेलाचा जास्त वापर केल्याने कॅलरीज देखील वाढू शकते, ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. जास्त तेलाचे सेवन केल्याने फॅटी लिव्हर सारखी समस्या देखील उद्भवू शकते. लोकांनी त्यांच्या जेवणात तेलाचा वापर कमीत कमी करावा.

Health: जास्त तेल खात असाल सावधान...! हृदयरोग, मधुमेह अन् कर्करोगासारख्या आजारांना देऊ नका आमंत्रण
Diabetes Biobank: भारतात बनली पहिली डायबिटीज बायोबँक; जाणून घ्या, ती कुठे आहे अन् शुगर नियंत्रणात कशी करेल मदत?

जास्त तेल खाणे आरोग्यासाठी चांगले नाही

जास्त प्रमाणात तेलाचे सेवन करणे एकूण आरोग्यासाठी चांगले नाही. जास्त तेलाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे हृदयातील अडथळा आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. यासोबतच कर्करोग, मधुमेह (Diabetes) आणि लठ्ठपणासारखे आजार होऊ लागतात.

Health: जास्त तेल खात असाल सावधान...! हृदयरोग, मधुमेह अन् कर्करोगासारख्या आजारांना देऊ नका आमंत्रण
World Diabetes Day 2024: मधुमेही रुग्णांनी काय खावे, काय खाऊ नये? Diabetes Educatorsनी दिला संपूर्ण प्लॅन

तेलाचा वापर वाढतोय

भारतात तेलाचा वापर वर्षानुवर्षे वाढत आहे. राष्ट्रीय पोषण संस्थेच्या मते, एका व्यक्तीने वर्षाला 10.585 किलो तेलाचे सेवन केले पाहिजे. मात्र दरवर्षी हा वापर वाढत आहे. 2010-11 मध्ये, भारतात दरडोई तेलाचा वापर प्रतिवर्ष 14.2 किलो होता. जो 2019-20 मध्ये प्रति व्यक्ती प्रतिवर्ष 19.80 किलो पर्यंत वाढला आहे. म्हणजेच, पाच दशकांत भारतात खाद्यतेलाचा वापर पाच पटीने वाढला आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या अहवालानुसार, तेलाच्या अतिरेकी वापरामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तो लठ्ठपणा आणि हृदयरोगांचा बळी बनत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com