लैंगिक अत्‍याचाराची तक्रार करून युवतीच 2 महिन्‍यांपासून गायब; मोबाईल बंद, पत्ताही दिला खोटा; संशयिताचा जामिनासाठी आटापिटा व्यर्थ

हरमल येथील कथित अत्याचार प्रकरणातील पीडित युवती (दिल्ली) तक्रार दाखल केल्यानंतर २७ एप्रिलपासून बेपत्ता आहे.
Arambol assault case Delhi girl missing
Arambol assault case Delhi girl missingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हरमल येथील कथित अत्याचार प्रकरणातील पीडित युवती (दिल्ली) तक्रार दाखल केल्यानंतर २७ एप्रिलपासून बेपत्ता आहे. तिचा मोबाईल बंद आहे. तसेच तिने दिलेला पत्ताही पडताळणीत चुकीचा आढळून आला आहे. मात्र या प्रकरणातील संशयित अखिलेश शेट्टी (३२, गोकर्ण-कर्नाटक) अजूनही कोठडीत आहे. विशेष म्‍हणजे येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने त्‍याला त्‍याचा जामीनअर्जही फेटाळला आहे.

न्यायालयाने नमूद केले की, पीडित युवती सध्या बेपत्ता असली तरी संशयिताविरोधातील आरोप प्रथमदर्शनी गंभीर आणि सबळ आहेत. पीडितेने पहाटेच्या वेळी हॉटेलच्या खोलीतून पळ काढून जवळील दुकानदाराकडे मदत मागितल्याचे त्या दुकानदाराच्या जबाबातून समोर आले आहे.

या प्रकरणातील सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे पीडित युवती २७ एप्रिलपासून संपर्काबाहेर आहे. तिचा मोबाईल बंद असून वैद्यकीय तपासणीसाठीही ती हजर राहिलेली नाही. दिल्ली पोलिसांच्या मदतीने तिच्या पत्त्याची पडताळणी करण्यात आली असता, तिने दिलेला पत्ताही चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले.

Arambol assault case Delhi girl missing
Goa Crime: 'गोमेकॉ'च्या इंटर्न डॉक्टरचा दोनापावला बीचवर मृतदेह; प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती

पीडितेने दिलेल्‍या तक्रारीनुसार, २४ ते २६ एप्रिल यादरम्यान हरमल येथे ओळख झाल्यानंतर संशयित अखिलेश याने दिला ‘हॅप्पी ट्री गेस्ट हाऊस’मधील खोलीत नेऊन इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच विरोध केल्यावर मारहाण केली. मांद्रे पोलिसांनी २६ एप्रिल रोजी अखिलेश शेट्टी याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Arambol assault case Delhi girl missing
Goa Mining: सप्टेंबरपासून गोव्यात खाणकामाला वेग, नऊ खनिज पट्ट्यांना मंजुरी; 7.5 दशलक्ष टन उत्खनन व निर्यातीस मान्यता

जामीन नाकारण्यामागील कारणे

तपास प्राथमिक अवस्थेत असणे

पीडितेची साक्ष अद्याप नोंदवली न जाणे

वैद्यकीय तपासणी प्रलंबित असणे

संशयित आरोपीकडून पुराव्यांशी छेडछाड किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com