Yuvraj Singh Dainik Gomantak
Image Story

Yuvraj Singh: 'सिक्सर किंग' मैदानात उतरतोय! 'या' मोठ्या स्पर्धेत खेळणार

International Masters League 2025: भारतीय क्रिकेट संघासाठी स्टार अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावणारा युवराज सिंग पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.

Sameer Amunekar
Yuvraj Singh

अष्टपैलू खेळाडू

भारतीय क्रिकेट संघासाठी स्टार अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावणारा युवराज सिंग पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. त्याने २००७ च्या टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी चमकदार कामगिरी करून भारताला विश्वविजेते बनवले होते.

Yuvraj Singh

एका षटकात सहा षटकार

युवराज सिंगने २००७ मध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकले होते. युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानावर परतणार उतरणार असल्यामुळं चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

Yuvraj Singh

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग

२२ फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग सुरू होणार आहे. या लीगमध्ये भारतासह ६ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघातील निवृत्त क्रिकेटपटू सहभागी होतात.

Yuvraj Singh

इंडिया मास्टर्स संघ

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये युवराज सिंग देखील भारताकडून खेळेल. तो सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्स संघातून खेळणार आहे.

Yuvraj Singh

कारकिर्द

युवराज सिंगने भारतासाठी ४० कसोटी सामने खेळले आहेत आणि १९०० धावा केल्या आहेत आणि ९ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय, ३०४ एकदिवसीय सामने खेळताना या खेळाडूने ८७०१ आणि १११ विकेट्स घेतल्या आहेत. ५८ टी-२० सामन्यांमध्ये ११७७ धावा करण्यासोबतच त्याने २८ फलंदाजांच्या विकेटही घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘मी पत्रकार असतो तर ...’ सरदेसाईंच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; Watch Video

Mohammed Siraj: 'मी बोल्ड करतो, तेंव्हाच सेलिब्रेशन करतो'! टीका करणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांवर सिराजचा बाऊन्सर

Rainforest Challenge 2025: खडकाळ वाटा, पाणथळ रस्ता आणि 'रेनफॉरेस्ट चॅलेंज'चा थरार..

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

Goa Assembly Live: रंगमंच कलाकार, उद्योजक परेश जोशी यांचे निधन

SCROLL FOR NEXT