Konark Sun Temple
Konark Sun Temple  Dainik Gomantak
Image Story

World Tourism Day: भारतामध्ये काय आहे? म्हणनाऱ्यांनी एकदा फिरून बघाच!

Rohit Hegade

तोडांत बोटं घालायला लावणारी वास्तुशिल्पे हजारो वर्षांपासून भारतात दिमाखात उभा आहेत.बौद्ध लेणी, प्राचीन मंदीरे, ताजमहल, कुतुबमीनार हि वास्तु शिल्पे बघा. त्यावरील कलाकुसर बघा, कुठल्याही यंत्रांशिवाय केलेल्या या कलाकुसर आहेत. यावरून भारतीय संस्कृतीत (Indian culture) किती महान कलाकार जन्माला आले होते याची प्रचीती येते. भारत एक नैसर्गिक विविधतेने नटलेला देश आहे. प्रचंड असा हिमालय ही इथे बघायला भेटेल, खाऱ्या समुद्राची गोडी ही इथे चाखता येते अन् वाळवंट ही इथे पहायला भेटेल. भारत एक विविधतेतील ऐक्याने सांस्कृतिक वारसा जपून भविष्यातील वाटचाल करणारे महान राष्ट्र आहे.

अद्भुत सौंदर्यामुळे कोणार्क सुर्य मंदिराला (Konark Sun Temple)भारताच्या 7 आश्चर्यांमधे स्थान मिळाले आहे. या प्राचीन मंदिराची निर्मीती इसवी सन 1250 मध्ये पुर्व गंगा राजवंशीय प्रसिध्द सम्राट नरसिम्हा देव यांनी केलीये.

कोणार्क सुर्य मंदिराची निर्मीती गंगा राजवंशाचे प्रसिध्द शासक राजा (King)नरसिम्हादेव यांनी 1243– 1255 दरम्यान 1200 मजुरांच्या मदतीने केली. या अप्रतीम सौंदर्याचा नमुना असलेल्या मंदीराचे नक्षीकाम करण्यास जवळजवळ 12 वर्षांचा मोठा कालावधी लागला. मंदिराच्या निर्मीती मागे अनेक पौराणिक (Legendary)आणि धार्मिक कथा देखील सांगितल्या जातात.

कोणार्क सुर्य मंदिराचा इतिहास (Konark Sun Temple History)

सुर्य देवाचे कोणार्क सुर्य मंदिर आपल्या अलौकिक कलाकृती आणि भव्यतेमुळे युनेस्को च्या वल्र्ड हेरिटेज साईट मध्ये देखील सहभागी करण्यात आले आहे.

इतिहासकारांच्या मते 13 व्या शतकात अफगाण शासक मोहम्मद शौरी च्या शासनकाळात ज्यावेळी मुस्लिम शासकांनी भारताच्या पुर्वेकडील राज्यांवर व बंगाल प्रांता सहीत कित्येक राज्यांवर ताबा मिळवला होता त्या वेळेपर्यंत कोणताही शासक या बलाढय मुस्लिम शासकांविरूध्द युध्द करण्याकरता पुढे आला नाही त्यावेळी हिंदु शासन नष्ट होण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचले होते आणि ओडीसा येथील हिंदु साम्राज्य देखील नष्ट होईल अशी भिती व्यक्त करण्यात येत होती.

अश्या परिस्थीतीत गंगा राजवंशाचे शासक नरसिम्हादेव यांनी आपल्या सैन्यांमध्ये (Military) मुस्लिमांविरूध्द बंड पुकारण्याचे साहस भरले आणि त्यांना अद्दल घडविण्याकरता आपल्या चतुर निती च्या सहाय्याने मुस्लिम शासकांविरूध्द युध्द पुकारले.

त्या दरम्यान दिल्ली (Delhi)च्या गादीवर सुल्तान इल्तुतमिश याचे राज्य होते. त्याच्या मृत्युनंतर नसीरूद्दीन मोहम्मद ला उत्तराधिकारी बनविण्यात आले व तुगान खान ला बंगाल चा राज्यपाल म्हणुन नियुक्त करण्यात आले. त्यानंतर ईसवीसन 1243 मध्ये नरसिम्हा देव प्रथम आणि तुगान खान यांच्यात मोठे युध्द झाले.या युध्दात नरसिम्हा देव यांनी मुस्लिम सेनेला नामोहरम करत मोठे यश संपादन केले. नरसिम्हा देव सुर्यदेवाचे मोठे उपासक होते, म्हणुन आपल्या विजयाच्या आनंदात त्यांनी सुर्य देवाला समर्पित असे कोणार्क सुर्य मंदिर बनविण्याचा निर्णय घेतला.

या विश्व प्रसिध्द कोणार्क सुर्य मंदिराचा आकार परमेश्वराच्या भव्य आणि विशाल रथा सारखा आहे. या रथात 24 चाकं असुन 6 घोडे नेतृत्व करतांना दिसुन येतात. ओडिसातील हे सुर्य मंदिर पाहातांना अतिशय सुंदर आणि भव्य दिसुन येते.

कोणार्क सुर्य मंदिराशी संबंधीत पौराणिक आणि धार्मिक कथा – Konark Sun Temple Story

ओडीसा येथील मध्ययुगीन वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या कोणार्क सुर्य मंदिराशी संबंधीत अनेक पौराणिक आणि धार्मिक कथा प्रसिध्द आहेत…

एका कथेनुसार एकदा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांबा याने नारदमुनिं समवेत अभद्र व्यवहार केला त्यामुळे क्रोधीत होउन नारद मुनींनी सांबा ला कुष्ठ रोग (कोड) होण्याचा श्राप दिला

या श्रापा पासुन वाचण्याकरता ऋषी कटक यांनी सांबाला सुर्यदेवाची कठोर तपस्या आणि आराधना करण्यास सांगीतले. भगवान श्रीकृष्णाच्या या पुत्राने शापा पासुन मुक्तता मिळविण्याकरता चंद्रभागा नदीच्या तिरावर मित्रवना शेजारी 12 वर्षांपर्यंत कष्ट निवारण सुर्य देवाचे कठोर तप केले.

त्यानंतर एक दिवस सांबा चंद्रभागा नदीत (Chandrabhaga river)स्नान करत असतांना पाण्यात त्याला सुर्यदेवाची मुर्ती मिळाली त्याने त्या मुर्तीला त्याच ठिकाणी स्थापीत केले जेथे आज हे विश्वप्रसिध्द कोणार्क सुर्य मंदिर स्थापीत आहे.

अश्या तऱ्हेने सुर्यदेवाची कठोर आराधना केल्याने सांबाची नारदमुनींनी दिलेल्या शापातुन मुक्तता झाली आणि त्याचा रोग नाहीसा झाला म्हणुन देखील या मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे. करोडो भाविकांची या मंदिराप्रती आस्था जोडली गेली आहे त्यामुळे खुप लांबुन भाविक येथे दर्शनाकरता येत असतात.

कोणार्क सुर्य मंदिराची अद्भुत वास्तुकला (Konark Sun Temple Architecture)

कोणार्क चे सुर्य मंदिर ओडीसातील मध्ययुगीन वास्तुकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराला कलिंग वास्तुकलेचा सर्वोच्च बिंदु मानण्यात येतो. कारण कोणार्क सुर्य मंदिराची वास्तुकला बऱ्याच प्रमाणात कलिंगा मंदिराच्या वास्तुकलेशी मिळती जुळती आहे.

ओडीसाच्या (Odisha)पर्वेकडील समुद्र किनारी पुरी नजिक स्थित या कोणार्क सुर्य मंदिराची संरचना आणि येथील दगडांपासुन बनविलेल्या मुर्त्या कामोत्तेजक मुद्रांमध्ये पहायला मिळतात ज्या या मंदिराच्या वैशिष्टयामधे अधिकच भर घालतात.

एक विशाल रथा सारखे प्रतित होणारे कोणार्क च्या सुर्य मंदिराला चाकांच्या 12 जोडया लागलेल्या आहेत या भव्य रथाला 7 धष्टपुष्ट घोडे ओढत असल्याचे आपल्याला दिसते. रथाला लागलेली ही चाकं घडयाळाचे देखील कार्य करतात. यावर पडणाऱ्या सावलीवरून वेळेचा अंदाज सहज लावल्या जाऊ शकतो.

मंदिराला असलेले 7 घोडे आठवडयाच्या 7 दिवसांचे प्रतिक आहेत तर चाकांच्या 12 जोडया दिवसातील 24 तासांना दर्शवितात चाकांमधल्या 8 काडया दिवसातील 8 प्रहरांना दर्शवितात.

काळया ग्रॅनाईटने (Granite)आणि लाल दगडांनी बनलेले हे एकमेव सुर्यमंदिर आहे जे आपल्या बांधकामाच्या खास पध्दतीमुळे आणि भव्यदिव्यतेमुळे पुर्ण जगात ओळखले जाते. या अद्भुत मंदिराच्या निर्माण कार्यात कित्येक मौल्यवान धातूंचा वापर करण्यात आला आहे.

या सुर्य मंदिरात सुर्य देवतेची बाल्यावस्था, युवावस्था, आणि वृध्दावस्था दर्शवणाऱ्या वेगवेगळया तीन मुर्ती पहायला मिळतात त्यांना उदित सूर्य, मध्यान्ह सूर्य आणि अस्त सूर्य देखील संबोधण्यात येते.

मंदिराला त्याच्या अप्रतीम सौंदर्यामुळे (Beauty)आणि अलौकिक वास्तुशिल्पामुळे युनेस्को च्या वल्र्ड हेरिटेज च्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. कोणार्क सुर्य मंदिराच्या प्रवेश व्दारावर वाघ हत्तींचा विनाश करत असल्याचे शिल्प पहावयास मिळते. येथे वाघ गर्व अहंकाराचे प्रतिक तर हत्ती धनाचे प्रतिक मानले गेले आहे.

लाखो भाविक ओडीसा मधे स्थित असलेल्या या सुर्य मंदीराशी श्रध्देने जोडले गेले आहेत. या मंदिरात दर्शन घेतल्याने आपली सर्व दुःख नाहीशी होतात आणि सर्व मनोकामना देखील पुर्ण होतात अशी भाविकांची मान्यता आहे.

या भव्य सुर्य मंदिराची अद्भुत कलाकृती आणि वास्तुशिल्पाला पहाण्याकरता देश विदेशातुन(Foreign) पर्यटक येथे येत असतात. ब्लॅक पॅगोडा नावाने देखील या मंदिराला ओळखले जाते. या मंदिरात असलेले उंच टॉवर काळे दिसत असल्याने हे नाव पडले असावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT