ट्रेन: ट्रेन आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. तुम्ही तुमच्या लहानपणी कधीतरी जवळून जाणाऱ्या ट्रेनचे डबे मोजण्याचा प्रयत्न केला असेल.
सुकर प्रवास: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण सर्सासपणे ट्रेनचा वापर जातो.
682 डबे: आज (6 ऑक्टोबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून अशा एका ट्रेनबद्दल जाणून घेणारोत, ज्या ट्रेनचे डबे मोजणे सोपे काम नाही. या 7 किलोमीटर लांबीच्या ट्रेनला 682 डबे आहेत.
वजन: 682 कोच असलेली ही जगातील सर्वात लांब ट्रेन आहे. ही ट्रेन चालवण्यासाठी 8 इंजिनांची गरज भासते. या ट्रेनचे वजन सुमारे एक लाख टन आहे.
द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयर्न ओर: जगातील सर्वात लांब ट्रेनचे नाव 'द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयर्न ओर' (The Australian Bhp Iron Ore) आहे. ही प्रवासी ट्रेन नसून एक मालगाडी आहे.
कुठून धावते: ऑस्ट्रेलियाच्या यांडी माइन ते पोर्ट हेडलँड बीचपर्यंत धावणारी ही ट्रेन 275 किलोमीटरचे अंतर कापते.
ऑस्ट्रेलियन BHP Iron Ore ट्रेन: ही सरकारी नसून खाजगी ट्रेन आहे. जी BHP च्या खासगी रेल्वे मार्गावर धावते. कंपनीने लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी हा रेल्वे मार्ग आणि ट्रेन तयार केली आहे.
मागणी कमी: मागणी नसल्यामुळे आता या ट्रेनमधील डब्यांची संख्या 270 करण्यात आली आहे. इंजिन 8 ऐवजी 4 पर्यंत कमी केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.