*आजकाल शाकाहार लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे अनेक लोक मांसाहार सोडून आता शाकाहार घ्यायला सुरुवात केली आहे. शाकाहार करणारे दीर्घ आयुष्य जगतात ? जाणून घ्या कोणता आहार घेतल्याने आपल्या आरोग्यास पोषण मिळते. Dainik Gomantak
* सर्वप्रथम हे जाणून घेवूया शाकाहारी आहार म्हणजे काय? अनेक लोक जे स्वता: ला शाकाहारी म्हणतात ते लॅक्टो-ओवो शाकाहारी असतात. हे लोक भाज्या, अंडी आणि दुधाचा समावेश करतात. जे शुद्ध शाकाहारी असतात त्यांना विगन म्हणतात. हे लोक केवळ पालेभाज्यांचा आहारात समावेश करतात. * शुद्ध शाकाहारी आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. तर मांसहारमध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. शुद्ध शाकाहारमध्ये फायबर, खनिजे, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
* मांसाहार पदार्थामध्ये प्रथिने आणि ओमेगा फॅटी 3 अॅसिड मुबलक प्रमाणात असतात. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की, शाकाहारप्रमाणे
पोषक घटक मिळत नाही. यामुळे आपले आरोग्य निरोगी राहत नाही. * मांसाहारमध्ये फॅट वाढण्याचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा वाढण्याचा धोका निर्माण होतो. तसेच मांसाहामुळे पचनशक्ती मंदावण्याची शक्यता असते. शाकाहार घेणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी असतो. * शाकाहारी आहारात सोडियम आणि साखरेचे प्रमण अधिक असल्याने आरोग्य निरोगी राहत नाही. तूप, तेल आणि चीज यासारख्या पदार्थांचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकते.