Mamta Kulkarni Dainik Gomantak
Image Story

Mamta Kulkarni: टॉपलेस फोटोशूट, डी कंपनीशी संबंध... महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णीशी संबंधित 3 मोठे वाद

Mamta Kulkarni controversies: ममता कुलकर्णी ही 90 च्या दशकातील एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिचे करिअर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस सुरू झाले आणि ती अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकली.

Sameer Amunekar
Mamta Kulkarni

लोकप्रिय अभिनेत्री

ममता कुलकर्णी ही 90 च्या दशकातील एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिचे करिअर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस सुरू झाले आणि ती अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकली. तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या वादग्रस्त घटनांसाठी देखील चर्चेत राहिली.

Mamta Kulkarni

चित्रपट

ममता कुलकर्णीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. करण अर्जुन (1995), सबसे बड़ा खिलाड़ी (1995), चाइना गेट" (1998), आशिक आवारा (1993) अशा अनेक चित्रपटामंध्ये तिनं काम केलंय. तिचं करिअर काही काळ चांगलं चाललं, पण नंतर तिनं बॉलिवूडमधून अचानक ब्रेक घेतला. पुढे ती काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकली आणि चर्चेत राहिली.

Mamta Kulkarni

टॉपलेस फोटोशूट

ममता कुलकर्णी सर्वप्रथम वादाच्या भोवऱ्यात आली जेव्हा तिने 1993 मध्ये स्टारडस्ट मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केले. त्या काळी हे अत्यंत धक्कादायक मानले जात होते. या फोटोशूटमुळे तिच्यावर टीका झाली, तसेच तिच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या. तिच्यावर अश्लीलता आणि सार्वजनिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला.

Mamta Kulkarni

ड्रग माफियाशी लग्न

विकी गोस्वामी हा एक ड्रग तस्कर होता, जो एक मोठ्या ड्रग माफिया रॅकेटचा भाग होता. 2016 मध्ये, ठाणे पोलिसांनी एका मोठ्या ड्रग तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला, ज्यामध्ये ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांचे नाव समोर आले. यावरून, दोघांच्या लग्नाच्या आणि त्याच्या ड्रग धंद्यांशी असलेल्या संबंधांविषयी चर्चा सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्सनूसार, ममता कुलकर्णीने विकी गोस्वामीशी लग्न केले आणि नंतर ती त्याच्या सोबत केनियात स्थायिक झाली

Mamta Kulkarni

डी कंपनीशी संबंध

ममता कुलकर्णीचे दाऊद इब्राहीम सोबतचे संबंध एक मोठा वादग्रस्त मुद्दा होता. दाऊद इब्राहीम हा भारताचा सर्वात मोठा अंडरवर्ल्ड डॉन आहे आणि त्याच्या संबंधांमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे नाव समोर आले आहेत. त्यात ममता कुलकर्णीचंही नाव होतं.

Mamta Kulkarni

महामंडलेश्वर

ममता कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला. ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT