1. मेरा नाम जोकर
ऋषी कपूर यांनी वयाच्या १७ व्या वर्षी पहिल्यांदा अभिनेता म्हणून कॅमेराचा सामना केला, जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांचा सर्वात महत्वाकांक्षी आणि साहसी चित्रपट 'मेरा नाम जोकर' मध्ये अभिनय केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील शोमॅन राज कपूर यांनी आपल्या मुलाला स्वतःची छोटी प्रतिकृती दाखवण्यासाठी अभिनयाची संधी दिली. त्यांचा हा निर्णय मास्टरस्ट्रोकपेक्षा कमी नव्हता. ऋषी कपूर यांनी या वास्तववादी अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला.
2. बॉबी
1973 मध्ये आलेला 'बॉबी' भारतीय चित्रपटांच्या ट्रॅडिशनल स्टाईलला धक्का देणारा ठरला. 80 च्या दशकाच्या सुरूवातीला एक बोल्ड हिरॉईन आणि एक एक गोरा गोमटा हिरो प्रेक्षकांनी मनापासुन स्वीकारला. बॉबीच्या ब्लॉकबस्टर यशानंतर, ऋषी कपूर यांनी मागे वळून पाहिले नाही.यानंतर आरके स्टुडिओने एकाहुन एक चांगले चित्रपट द्यायला सुरूवात केली.
3. लक बाय चान्स (2009)
ऋषी कपूर यांच्या अभिनयासाची उत्तर काळातली इनिंग या चित्रपटाने चमकली असं म्हणता येईल असा चित्रपट म्हणजे लक बाय चान्स. या चित्रपटातल्या पहिल्या परफॉर्मन्सपैकी एक जो अजूनही नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
ऋषी कपूर यांचं पात्र एक स्वाभिमानी परंतु हळुवार मनाचा चित्रपट निर्माता ज्याला आपलं करिअर घडवण्याचा अभिमान आहे. त्याचं करिअर फक्त एका स्टारसह ब्लॉकबस्टर बनविण्यावर आधारित आहे. जफर खान ही या चित्रपटातली भूमीका हृतिक रोशनने केली आहे
4.दो दूनी चार (2010)
2010 मध्ये, सेकंड इनिंगचा ऋषी कपूरचा एक महत्त्वाचा चित्रपट त्याला एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या भूमिकेत कास्ट केले जो आपल्या कुटुंबासाठी कार खरेदी करण्याचा प्रयत्न करतो.
हबीब फैझलच्या 'दो दूनी चार' मध्ये, ऋषीजी नीतू कपूरसोबत एका प्रेमळ स्लाइस-ऑफ-लाइफ ड्रामा कम कॉमेडीसाठी पुन्हा एकत्र आले.पती पत्नीच्या नात्यातला गोडवा यानिमीत्ताने पाहायला मिळाला.
5. औरंगजेब (२०१३)
'औरंगजेब'ने सर्वाधिक हिट चित्रपट म्हणुन भारतीय चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे. कथेच्या सुरुवातीपासूनच या गोष्टी स्पष्ट कळते की तो एक भ्रष्ट अधिकारी आहे, परंतु आणखी काहीतरी वाईट आणि राक्षसी आहे जे तो बराच काळ लपवतो.
कथा जसजशी पुढे सरकते तसतसा मुखवटा हळूहळू निघायला लागतो आणि जेव्हा तो त्याचा खरा चेहरा उघड करतो तेव्हा धक्का बसतो आणि शांतता असते. ऋषी कपूर यांचा हा चित्रपट एका वेगळ्या विषयावर भाष्य करतो.
6.कपूर अँड सन्स (2016)
या चित्रपटातला प्रोस्थेटिक मेकअप हा चर्चेचा विषय ठरला होता. शकुन बत्राच्या या व्यक्तिरेखेचे चित्रीकरण करण्याची अनोखी शैलीशी थोडे मतभेद झाल्यामुळे ऋषी कपूरने दोनदा चित्रपट सोडला. हा 86 वर्षांचा माणूस गोंडस, मोहक आणि चंचल होता. चुकलेल्या निर्णयांमुळे आणि जवळजवळ अक्षम्य पापांमुळे कोसळत असलेल्या आपल्या कुटुंबाला एकत्र बांधण्याचा त्याचा हेतू आहे. थोडक्यात ही एका कौटुंबिक माणसाची गोष्ट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.