Virat Kohli Dainik Gomantak
Image Story

IND Vs ENG: इंग्लंडविरुद्धचा दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा विजय; मात्र, विराट कोहली टेन्शनमध्ये, कारण काय?

Virat Kohli: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना चेन्नईमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडचा २ विकेट्सनं पराभव केला.

Sameer Amunekar
Team India

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना चेन्नईमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा २ विकेट्सने पराभव केला. इंग्लंडने टीम इंडियासमोर १६६ धावांचं लक्ष्य ठेवले होतं.

Tilak Varma

टीम इंडियाने हा सामना ८ विकेट्स गमावून जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो तिलक वर्मा होता. त्यानं ५५ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या सामन्यात तिलक वर्मानं इंग्लंडच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.

Tilak Varma

तिलक वर्मानं या खेळीदरम्यान ४ चौकार आणि ५ षटकार मारेल. तिलक वर्मानं सुंदर, बिश्नोई आणि अर्शदीपसोबत महत्त्वाच्या भागीदारी केल्या आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा विजय झालाय, मात्र विराट कोहलीचं टेन्शन वाढलं आहे.

RCB

आयपीएल स्पर्धेत गेल्या 17 वर्षांपासून आरसीबीला एकही विजेतेपद मिळवता आलं नाहीय. 2024च्या लिलावात आरसीबीनं चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर बोली लावली आहे. यात इंग्लंड संघातील तीन खेळाडूंचा समावेश आहे.

Liam Livingstone

भारतीय मैदानावर टी-20 मालिकेत इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. फिल सॉल्ट आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाहीय. तसंच फिल सॉल्टही खराब फॅार्ममध्ये असल्याचं पाहायला मिळतंय.

Virat Kohli

या खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळं आता आरसीबी संघ टेन्शनमध्ये आला आहे. लवकरच आयपीएल सुरू होणार आहे, आरसीबीच्या खेळाडूंची खराब कामगिरी पाहता संघाला विजेतेपद जिंकण कठीण वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT