PM Kisan Dainik Gomantak
Image Story

PM Kisan: पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची तारीख जाहीर; 'या' तारखेला खात्यात जमा होणार पैसे

PM Kisan 19th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जामा होणार आहे.

Sameer Amunekar
PM Kisan

योजनेचा 19 वा हप्त्या

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली मिळते. आतापर्यंत 18 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. सध्या शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

PM Kisan

खात्यात लवकरच जमा होणार पैसे

बऱ्याच दिवसांपासून शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा पुढच्या हप्ताची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

PM Kisan

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार दौऱ्यावर असणार आहेत. त्याच दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिलीय.

PM Kisan

दरवर्षी 6 हजार रूपये अनुदान

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे, जी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रूपये अनुदान मिळते, जे तीन समान हप्त्यांमध्ये (₹2,000 प्रति हप्ता) त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते.

PM Kisan

आर्थिक मदत

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे, शेतीविषयक खर्च भागविण्यास मदत करणे. शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे. आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

PM Kisan

पात्रता

कोणत्याही राज्यातील लहान आणि सीमांत शेतकरी यासाठी पात्र आहे. शेतकऱ्यांकडे किमान 2 हेक्टर (5 एकर) पर्यंत जमीन असणे आवश्यक नाही. आधार कार्ड असणे आवश्यक. बँक खाते आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT