इंडिया ट्रेड प्रोमोशन संस्थेतर्फे (ITPO) आयोजित 40व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (IITF) गोव्याचा कक्ष (पॅव्हेलियन) उभारण्यात आला आहे. Twitter /@DIP Goa
या वर्षाची मेळाव्याची संकल्पना ‘आत्मनिर्भर भारत’, नवीन भारताची दृष्टी अशी आहे. माहिती खात्याव्यतिरिक्त पर्यटन विभाग, हस्तकला विभाग, वस्त्रोद्योग आणि कॉयर विभाग, उद्योग व्यापार आणि वाणिज्य संचालनालय, गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि गोवा गुंतवणूक प्रोत्साहन सुविधा मंडळ अशी पाच खाती या मेळ्यात सहभागी झाले आहे. प्रगती मैदानावर हॉल क्रमांक 3 एफ बेअर स्पेसमध्ये 60 चौरस मीटर क्षेत्रफळावर गोवा मंडप उभारण्यात आला आहे. गोव्याच्या दालनात गोव्याची प्रगती, गोव्यात गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या साधनसुविधा, पर्यटन, गोव्याची उच्च पाककृती, आदरातिथ्य, कला- संस्कृती आणि इतर सुविधांवर प्रदर्शन मांडण्यात आले आहे. दालनाला भेट देणाऱ्या लोकांना गोव्याच्या माहितीवरील पुस्तिका वितरीत करण्यात आले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या (DIP) माहिती साहाय्यक पूजा पालयेकर धारगळकर यांनी गोवा पॅव्हेलियनचे फीत कापून उद्घाटन केले आहे.