मेरशी: श्री काळंबादेवी, सिध्देश्र्वर, औदुंबर देवस्थानी नवरात्रोत्सव धार्मिक देवकृत्यांनी साजरा केला जात आहे.  Dainik Gomantak श्रीस्थळ-मेरशी काळंबादेवी देवस्थान
Image Story

Navratri Festival 2021: गोव्यात आजपासून नवरात्रोत्सव प्रारंभ

गोव्यात सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक
दाबोळीतआल्त चिखली वास्को येथील श्री नृसिंह सातेरी संस्थानचा नवरात्रोत्सव 7 ते 15 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
हेडलँड सडा येथील श्री ईश्वटी ब्राम्हण लक्ष्मीनारायण मंदिरात नवरात्रोत्सवा प्रीत्यर्थ दररोज सकाळी अभिषेक व संध्याकाळी ७ वाजता विविध भजनी मंडळांकडून भजने सादर होतील.
सड्यावरील कलावती आई मंदिरासमोर नवरात्रोत्सव साजरा होणार आहे.
साळ येथे श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थान हसापूर येथे नवरात्रोत्सव उत्सवात साजरा करण्यात येत आहे.
मुरगाव रूमडामळ येथील श्री रूमडेश्वर सार्वजनिक नवरात्रोत्सव समितीची वार्षिक सभा नगरसेवक दामोदर नाईक व देवस्थानचे अध्यक्ष गुरूदत्त खाजनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नवरात्र उत्सव समिती निवडण्यात आली.
पेडणे: येथील श्री भगवती मंदिर तसेच श्री देवी माउली मंदिर सरमळे, श्री देव आदिस्थान, श्री देवी सातेरी या देवस्थानांच्या सर्व मंदिरांत नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
उगवे येथील श्री माऊली मंदिरात 7 ते 15 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
मडकई: मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थानात नवरात्रोत्सवात यंदा युवा कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.
म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानात 7 ते 14 ऑक्‍टोबरपर्यंत नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काणकोण: पैंगीण येथील श्री नवदुर्गा देवालयात आजपासून नवरात्रोत्‍सवाला आरंभ होत आहे.
आगोंद: श्रीस्थळ-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवालयात नवरात्र उत्सवानिमित्त 7 ते 14 ऑक्टोबरपर्यंत विशेष पूजाअर्चा होईल.
सावईवेरे: वळवई येथील श्री गजांतलक्ष्मी देवस्थानचा नवरात्रोत्सव 7 ते 14 तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
येथे श्री शांतादुर्गा देवस्थानात 7 ते 14 ऑक्‍टोबरपर्यंत नवरात्रोत्‍सव साजरा होणार आहे.
म्हापसा: माशेल येथील श्री शांतादुर्गा वेर्लेकरीण देवस्थानात गुरुवारी 7 पासून नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
साळ : मेणकुरे फ्रेंडस सर्कल क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ- मेणकुरे तसेच कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त रविवार, 10 ऑक्‍टोबर रोजी मेणकुरे येथील श्री देवी माऊली मंदिराच्या प्रांगणात ‘घुमट गाज’ या घुमट आरती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT